मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने ही नोटीस जारी केली आहे
मुंबई 06 ऑगस्ट : मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने ही नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे आता अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Pune : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुशील खोडवेकर पुन्हा प्रशासकीय सेवेत रुजू
काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी 4 ते 5 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन अस्लम शेख त्यांना भेटले आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने ही भेट झाली होती आणि या भेटीचं नेमकं कारणही स्पष्ट झालं नव्हतं. विशेष म्हणजे या बैठकीनंतर मोहित कंबोज यांच्या गाडीतून दोघही निघाले होते. त्यामुळे शेख यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Amruta Fadnavis: 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' ऐकताच उद्धवजींचा चेहरा समोर येतो; अमृता फडणवीसांचा खोचक टोला
या भेटीआधीच किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. "अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत", असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्या पाठीमागे देखील ईडीचा ससेमिरा लागणार की काय? अशा चर्चा होत्या. अशात आता त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, की मला हा स्टुडिओ पाडण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.