जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...तर आमदार उद्धव ठाकरेंना सोडूनच गेले नसते; आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

...तर आमदार उद्धव ठाकरेंना सोडूनच गेले नसते; आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

रामदास आठवलेंचा पुन्हा ठाकरेंवर निशाणा

रामदास आठवलेंचा पुन्हा ठाकरेंवर निशाणा

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 27 जून, हरीष दिमोटे : सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.   उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावली असती आणी मला बाजूला उभं केलं असतं तर एव्हढे आमदार फुटले नसते, त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओढावली नसती. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात आठवले यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले आठवले?  आठवले यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात दिव्यांगांना विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणं उद्धव ठाकरेंचा नाईलाज होता. त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर गेले आहेत असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Breaking news : उद्धव ठाकरे, राऊतांच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं बजावलं समन्स

  बीआरएसवर प्रतिक्रिया  आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. याबाबत आठवले यांना विचारलं असता,  के. चंद्रशेखर राव यांचे बरेच बोर्ड महाराष्ट्रात दिसत आहेत. मात्र अशी नवी पार्टी महाराष्ट्रात येऊन काही फरक पडणार नाही. त्यांना फारशी मतं मिळणार नाहीत. नवीन पक्ष आला की इकडचे तिकडचे लोक पक्षात जातच असतात. त्यामुळे महाराष्ट्रात काही फार फरक पडणार नाही असं आठवले यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात