जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking news : उद्धव ठाकरे, राऊतांच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं बजावलं समन्स

Breaking news : उद्धव ठाकरे, राऊतांच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं बजावलं समन्स

संजय राऊत, उद्धव ठाकरेंना समन्स

संजय राऊत, उद्धव ठाकरेंना समन्स

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून, प्रशांत बाग : मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्सन बजावण्यात आलं आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे.  दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण?  सामना या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोर्टात काय झालं?  दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. शेवाळे यांनी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून सादर केला. न्यायालयीन कामकाजादरम्यान,  असा युक्तिवाद  करण्यात आला  की शेवाळे यांनी आपले जीवन शिवसेनेसाठी समर्पित केलं आहे. मात्र खासदार म्हणून खोट्या रिअल इस्टेट दाव्यांमुळे त्यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की त्यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर त्याचा अर्थ त्या देशाशी त्याचे चांगले संबंध आहेत. हे अत्यंत अनादरकारक आहे असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात