अहमदनगर, 11 मे, साहेबराव कोकणे : कर्जतमधून मोठी बातमी समोर येत आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत भाजपनं रोहीत पवार यांना मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच कर्जत बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कर्जत बाजार समितीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून आपली पूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती. मात्र दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले होते. दोन्ही बाजुने समान संख्याबळअसल्यानं कर्जत बाजार समितीमध्ये सभापती नेमका कोणाचा होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या निवडणुकीत राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या गटाचे सभापती आणि उपसभापती पदाचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. सभापतीपदी काका तपकिरे तर उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे. ना कुठला लवाजमा ना कुठली सुरक्षा; सगळीकडे फक्त महाजनांच्याच साधेपणाची चर्चा! दोन्हीकडे समान संख्याबळ कर्जत बाजार समितीची निवडणूक शिंदे आणि पवार यांनी प्रतिष्ठेती बनवली होती. या बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र या बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर यामध्ये राम शिंदे यांनी बाजी मारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.