Home /News /maharashtra /

Shiv sena Uddhav Thackeray : शिवसेनेचे 5 आमदार अजूनही कुंपणावर, सत्तेचं सुकाणू आता या  5 जणांकडे, हे आहेत तरी कुठे?

Shiv sena Uddhav Thackeray : शिवसेनेचे 5 आमदार अजूनही कुंपणावर, सत्तेचं सुकाणू आता या  5 जणांकडे, हे आहेत तरी कुठे?

शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी (eknath shinde guwahati) येथे बंडखोर आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले.

  मुंबई, 23 जून : शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी (eknath shinde guwahati)  येथे बंडखोर आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत (42 mla in guwahati) शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान शिवसेनेसोबत (shiv sena) 13 आमदार असल्याचे बोलले जात आहे तर 35 आमदारांनी बंडखोरी केली आहे. पण उरलेले 5 आमदार आहेत कुठे हा प्रश्न सर्वांसमोर आहे. यामुळे एकनाथ शिंदे बहुमत सिद्ध करणार का? की एकनाथ शिंदे यांचे बंड संपणार हा येणार काळच सांगू शकेल.

  शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते. त्यावेळी शिंदे यांनी हे शक्तीप्रदर्शन करत आपल्यासोबत सेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान ते 5 आमदार कोण ते नेमके आहेत कुठे? याबाबत काय होणार हे पुढच्या काळात समजणार आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या दावा आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यावर समजेल असेही त्यांनी सांगितले आहे.

  हे ही वाचा : भाजप करणार सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यानी दिली महत्त्वाची माहिती

  महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

  दादा भुसे आणि संजय राठोड हॉटेलमध्ये दाखल होताच हे पत्र घेऊन जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे.

  हे ही वाचा : गुवाहाटीतून सगळ्या आमदारांचा पहिलाच VIDEO, एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

  महाराष्ट्राचं राजकारण सध्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनच्या अवतीभवती फिरत आहे. याच रॅडिसन हॉटेल बाहेर आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हॉटेल बाहेर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

  आसाममधील पूरस्थिती नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकीकडी ही परिस्थिती असताना आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Mla, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या