धक्कादायक: सांगलीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आले 337 नागरिक

धक्कादायक: सांगलीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आले 337 नागरिक

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

  • Share this:

सांगली, 28 मार्च: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी इस्लामपूर शहरात उद्यापासून अर्थात 29 मार्च ते 31 मार्च अखेर पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

नगरपालिकेच्या सभागृह झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात दूध, भाजीपाला आणि किराणा दुकानही बंद राहणार आहेत.

हेही वाचा..कोरोनाबाधितांवर होणार कॅशलेस उपचार, राज्य सरकारने केली मोठी घोषणा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगलीत काल एकाच कुटुंबात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही 23 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईपाठोपाठ पुण्याचा नंबर लागत होता. पण, आता सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा..क्वारंटाइन असताना बाहेर पडलात तर खबरदार, पोलीस दररोज करणार VIDEO CALL

या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने तातडीने बैठक बोलावली. इस्लामपूर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त मेडिकल स्टोअर्स एक दिवसाआड सुरू राहणार आहे. मात्र दूध, भाजीपाला, किराणा दुकानही बंद राहणार आहेत. शहरातील बँका, पतसंस्थांनीही लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा... कोरोना झालेल्या 'त्या' तरुण आणि विवाह आयोजक कुटुंबावर डोंबिवलीत गुन्हा दाखल

इस्लामपूर शहरातील साडेतीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आला आहे. 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 लोक इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात झाली.

First published: March 28, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या