कोरोना झालेल्या 'त्या' तरुण आणि विवाह आयोजक कुटुंबावर डोंबिवलीत गुन्हा दाखल

कोरोना झालेल्या 'त्या' तरुण आणि विवाह आयोजक कुटुंबावर डोंबिवलीत गुन्हा दाखल

या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

कल्याण, 28 मार्च: डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि पश्चिमेला लग्न समारंभात गर्दी झाली होती. त्यात परदेशातून आलेल्या एका तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. सध्या तरुणावर मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साथीचा रोग पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून 2 पोलीस स्थानकात कोरोना पसरवल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीत 3 गुन्हे दाखल केले आहे. यात कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केलाच तर नवरदेव, आई-वडील आणि जागामालकावर गुन्हा दाखल केला आहे.भादंवि कलम 188, 269, 270, 271 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे.

हेही वाचा...डोंबिवलीकर तरुणाचा कहर, हळदी अन् लग्नात झाला हजर, मित्रांना मेसेज करून सांगितलं मला कोरोना...

मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली येथील तरुण रुग्‍ण 18 मार्च रोजी हळद तसेच 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील विवाह समारंभ उपस्थित होता.

तरुणाला या कार्यक्रमात कोरोणाची लागण झाली असावी, अशी शक्यता आहे. त्यामुळे हळदी लग्न समारंभाला आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली असावी. ते नेमके किती होते याबाबत पोलिस माहिती आहे. हळद, लग्न आयोजकांवर शनिवारी रामनगर आणि विष्णूनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली. 18 मार्च हळद आणि 19 मार्च रोजी लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा...कल्याण-डोंबिवली आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण, लग्न सोहळ्यात एकाला झाली लागण

मित्रांना मेसेज करून सांगितलं मला कोरोना...

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी एका ठिकाणी गर्दी करू नये म्हणून लॉकडाऊन आणि संचारबंदी सारखा कठोर निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. डोंबिवलीत एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. डोंबिवली पूर्वे भागात हा तरुण राहत असून तो काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान येथे फिरायला गेला होता. तो मुबंई परत आल्यावर त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं होतं. मात्र, तसं असून सुद्धा तो एका हळद आणि लग्न समारंभात गेला होता.

हेही वाचा...मानलं गड्यांनो तुम्हाला! कल्याण RPFचे जवानच शिवताहेत मास्क

विशेष म्हणजे, त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती मेसेजरवर आपल्या मित्रांना दिली होती. आपणही हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहोत, याची माहिती सुद्धा दिली.हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. आता हा तरुण जिथे गेला तिथे पालिकेकडून फवारणी आणि तेथील नागरिकांची तपासणी सुरु आहे, असं एका नगरसेवकाने सांगितलं आहे.

First published: March 28, 2020, 7:25 PM IST

ताज्या बातम्या