पुणे 28 मार्च : कोरोनाच्या प्रकोपानंतर पुणे आणि मुंबईत जगभरातून नागरीक परत आलेत. त्यामुळे या दोनही शहरांमध्ये कोरोनाची लागण झाली. विदेशातून आलेल्या लोकांना प्रशासन 14 दिवस आपल्याच घरात क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देत आहे. मात्र प्रशासन आणि पोलिसांनी अनेकदा सांगूनही असे लोक घराबाहेर पडतात आणि संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होतो. अशी अनेक उदाहरणं घडल्याने पुणे पोलिसांनी आता अशा लोकांवर हायटेक साधनांच्या साह्याने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पुणे शहरात विलगीकरण कक्षाची शिफारस केलेल्या 1276 व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी 152 पोलीस पथके स्थापन करण्यात आली. आहेत. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असून त्यांना आवश्यक सुविधा ( ग्लोव्हज, मास्क व सॅनिटायझर ) उपलब्ध करून देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन तो हजर असल्याची खातरजमा केली जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात घरी मिळून आलेल्या 821 व्यक्तींचा दररोजचा संपर्क टाळण्यासाठी त्यांना पोलीसांनी whats app video call करुन त्यांचे घरातील ठराविक जागेवर उभे राहून उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 167, मुंबईत सापडले 7 नवे रुग्ण
हा वेळही वाचण्यासाठी पोलिसांनी Facial Recognition system आधारीत App विकसित केलं आहे. या प्रणालीनुसार क्वारंटाइन लोकांना विशिष्ट ठिकाणी उभे राहून घडयाळाचे समोर सेल्फी काढून Appवर अपलोड करावा लागणार आहे. त्याचवेळी सदर ठिकाणचे भौगोलिक अक्षांश / रेखांश स्थान नोंदवले जाणार आहे.
मानलं गड्यांनो तुम्हाला! कल्याण RPFचे जवानच शिवताहेत मास्क
या प्रणालीत त्या व्यक्तीने दिवसभरात दोन वेळा, सकाळी 8 वा. पासून रात्री 10 वा. पर्यंत किमान 2 वेळा आपला फोटो अपलोड करावा लागणार असून तसे न केल्यास त्याची अनुपस्थिती तात्काळ पोलीसांना उपलब्ध होईल. ही प्रणाली राज्यभर राबविण्याचा सरकारचा विचार आहे.

)







