मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पुण्याच्या या शास्त्रज्ञ बाईंचा Google ने doodle च्या रूपाने केला मानाचा मुजरा

पुण्याच्या या शास्त्रज्ञ बाईंचा Google ने doodle च्या रूपाने केला मानाचा मुजरा

मराठमोळ्या शास्त्रज्ञ (Cell Biologist) डॉ. कमल रणदिवे यांच्याबद्दल माहीत आहे का? त्यांचं काम का आहे मोठं?

मराठमोळ्या शास्त्रज्ञ (Cell Biologist) डॉ. कमल रणदिवे यांच्याबद्दल माहीत आहे का? त्यांचं काम का आहे मोठं?

मराठमोळ्या शास्त्रज्ञ (Cell Biologist) डॉ. कमल रणदिवे यांच्याबद्दल माहीत आहे का? त्यांचं काम का आहे मोठं?

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: गुगलचं डूडल (Google Doodle) हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. त्या त्या दिवशीचं दिनविशेष लक्षात घेऊन गुगलवर हे डूडल टाकण्यात येतं. त्यामुळे जगभरातील अनेक ज्ञान-अज्ञात महान व्यक्तींची ओळख होते किंवा त्याविषयी आणखी माहिती मिळते. आजही गुगलनं केलेलं डूडल खास आहे आणि आपल्या मराठी माणसांसाठी विशेष अभिमानाचं आहे. भारतातील प्रसिद्ध सेल बायोलॉजिस्ट (Cell Biologist) म्हणजेच पेशींच्या अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे (Dr. Kamal Ranadive) यांच्या 104 थ्या जन्मदिनानिमित्त त्यांची आठवण म्हणून हे डूडल करण्यात आलं आहे.

पुण्यात जन्मलेल्या आणि जगासाठी महत्त्वाचं काम करून ठेवलेल्या या महिला शास्त्रज्ञाबद्दल (who is dr kamal ranadive) माहिती करून घ्यायलाच हवी. भारतातील पाहुणे कलाकार इब्राहिम रेनिकांथ (Ibrahim Raynikanth) यांनी हे डूडल तयार केलं आहे. डॉ. कमल रणदिवे या कॅन्सरवरील मूलभूत संशोधनासाठी तर ओळखल्या जातातच पण विज्ञान आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता निर्माण करण्यासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती म्हणूनही त्यांची ओळख आहे.

मुलांसाठी लस अजूनही नाहीच, DGCI च्या मंजुरीसाठी होतोय उशीर

 20 व्या शतकातील लॅब अस्थेटिक्स आणि कुष्ठरोग तसंच कॅन्सरशी निगडित असणारं पेशींचं मायक्रोस्कोपिक जग हे आपल्या प्रेरणेचे मुख्य स्रोत आहेत’, असं रेनिकांथ यांनी या डूडलबद्दल सांगितलं. डॉ. कमल रणदिवे या मायक्रोस्कोपमधून बघतानाचं डूडल त्यांनी तयार केलं आहे.

कमल समर्थ म्हणजेच कमल रणदिवे यांचा जन्म 1917 साली पुण्यात झाला. कमल यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्या शिक्षणात भरघोस यश मिळवू शकल्या. मात्र जीवशास्त्र हीच त्यांची खरी आवड होती.

1949 मध्ये त्यांनी इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (ICRC) मध्ये संशोधक म्हणून काम करत असताना सायटॉलॉजी म्हणजेच पेशींच्या आकाराचा आणि कार्यांच्या अभ्यासात डॉक्टरेट मिळवली. अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या फेलोशिपनंतर त्या मुंबईत (तेव्हाचे बॉम्बे) परतल्या. मुंबईतच ICRC मध्ये त्यांनी देशातील पहिली पेशींच्या अभ्यासासाठीची प्रयोगशाळा सुरु केली.

त्या ICRC च्या संचालक होत्या आणि कर्करोगाच्या विकासाच्या ॲनिमल मॉडेलिंगचा पाया त्यांनी रचला. डॉ. कमल रणदिवे यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि अनुवंशिकता तसंच कर्करोग आणि काही विषाणू यांच्यामधील संबंध दाखवून देणाऱ्या काही पहिल्या संशोधकांपैकी त्या होत्या.

तुम्हालाही Social Media वर सतत निगेटिव्ह स्टोरी वाचण्याची सवय लागलीय का? मग वाचा

डॉ. कमल रणदिवे यांचं प्रत्येक क्षेत्रातील काम पथदर्शी आहे. त्यांनी कुष्ठरोगाला कारणाभूत ठरणाऱ्या मायक्रोबॅक्टेरियम लेप्रेचा अभ्यास केला आणि लस विकसित करण्यासाठी त्याची मोठी मदत झाली. विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी 1973 मध्ये डॉ. रणदिवे आणि त्यांच्या 11 सहकाऱ्यांनी मिळून इंडियन वुमेन्स साइंटिस्ट असोसिएशन (IWSA) ची स्थापना केली.

परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या बुद्धिमान भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत येऊन भारतातील समाजासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहन देत असत. 1989 मध्ये निवृत्त झाल्यानंतर डॉ. कमल रणदिवे यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी खूप काम केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि पोषणाबद्दलचं शिक्षण आणि प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

5 लाखांत गाडीचं केलं घर, फिरत्या खोलीतून पूर्ण केली भटकंतीची हौस; पाहा VIDEO

भारतभरात आता IWSA च्या 11 शाखा आहेत विज्ञान क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या महिलांना स्कॉलरशीप आणि लहान मुलांना सांभाळण्याचे अनेक पर्याय IWSA च्या मार्फत दिले जातात. डॉ. कमल रणदिवे यांचे अनेक विद्यार्थी आज नावाजलेले शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. डॉ. रणदिवे यांच्या आरोग्य आणि शिक्षणक्षेत्रावरील निष्ठा आणि योगदानाचा प्रभाव त्यांच्या विद्यार्थ्यांवर कायमच राहिला आहे. डॉ. कमल रणदिवे यांचं 11 एप्रिल 2001 ला निधन झालं. त्यांनी दिलेला वारसा आज अनेक महिला शास्रज्ञ जोमाने चालवत आहेत.

First published:

Tags: Google, Pune, Science, Scientist, Woman