• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • मुलांसाठी लस अजूनही नाहीच, DGCI च्या मंजुरीसाठी होतोय उशीर

मुलांसाठी लस अजूनही नाहीच, DGCI च्या मंजुरीसाठी होतोय उशीर

लहान मुलांसाठीच्या लसीची प्रतीक्षा (more wait Bharat Biotech vaccine for kids for technical reasons) वाढतच चालल्याचं चित्र आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: लहान मुलांसाठीच्या लसीची प्रतीक्षा (more wait Bharat Biotech vaccine for kids for technical reasons) वाढतच चालल्याचं चित्र आहे. या महिन्यात अपेक्षित असलेली कोव्हॅक्सिन कंपनीची लहान मुलांसाठीची लस किमान पुढचे काही दिवस तरी बाजारात येण्याची शक्यता धूसर असल्याचं चित्र आहे. डीजीसीआयकडून या लसीला मंजुरी (Delay for approval) मिळण्याच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामागे काही तांत्रिक कारणं असून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अद्याप काही महिने लागू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलांसाठी बनतेय लस भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून लहान मुलांसाठीची लस तयार करण्यात आली आहे.  2 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस तयार आहे. या लसीच्या पहिल्या तीनही टप्प्यांच्या चाचण्या पार पडल्या असून शेवटची औपचारिकता बाकी आहे. मात्र लहान मुलांसाठीची ही लस असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता सर्व निकषांची वारंवार खातरजमा केल्यानंतरच या लसीला लहान मुलांवर वापर करण्यासाठी परवानगी देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. कोव्हॅक्सिनकडून या लसीबाबत सादर करण्यात आलेला डेटा तपासण्याचं आणि त्याचं पृथक्करण करण्याचं काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर लसीच्या वापराला परवानगी मिळू शकणार आहे. हे वाचा- आता केवळ लस नाही तर गोळ्या घेऊन बरा होणार COVID,या देशाने सर्वप्रथम दिली मान्यता कॅनडा आणि अमेरिकेतही मिळणार लस भारतातील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लहान मुलांच्या लसीला अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांतदेखील परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी त्या देशांतील संबंधित यंत्रणांकडे अर्ज आणि नमुने दाखल करण्यात आले असून कुठल्याही क्षणी त्यासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. आता भारताअगोदर बाहेरच्या देशात ही परवानगी अगोदर मिळते की DGCI मधील मंजुरीची प्रक्रिया लवकर पार पडते, याबाबत उत्सुकता आहे. मात्र दिवाळीत लहान मुलांची लस उपलब्ध होण्याची शक्यता मावळली आहे.
  Published by:desk news
  First published: