नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : बाहेरच्या जगाच्या नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी घरीच राहणं चांगलं आहे, असं अनेकवेळा वाटतं, परंतु, आजच्या युगात घरात राहूनही तुम्ही बाहेरच्या जगापासून दूर राहू शकत नाही. कारण, तुमचं एक रूप तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगातही (Virtual World) फिरत असतं. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात स्मार्ट फोनवर सर्फिंग करताना सतर्क राहा, असं म्हटलंय. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो, असंही यात (Negativity On Social Media) सांगण्यात आलंय.
यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच्या (Essex University) सोशल मीडियासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनात ही तथ्यं समोर आली आहेत. कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय.
लोकांनी ट्विटर आणि यूट्यूबवर नकारात्मक बाबी पाहिल्या, तेव्हा ते उदास झाले. इथं एक धक्कादायक ट्रेंडदेखील उदयास आला. वास्तविक, जेव्हा लोकांना कोरोनाशी संबंधित नकारात्मक आणि सकारात्मक बातम्या वाचण्यास देण्यात आल्या, तेव्हा त्यांना नकारात्मक कथांमुळं जास्तच नैराश्य आलं. त्याच वेळी जेव्हा सकारात्मक कथा वाचायला दिली गेली, तेव्हा त्याचा त्याच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही.
हे वाचा -
शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव
काय आहे डूम स्क्रोलिंग (Doomscrolling)
सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्यांचा मनावर अधिक नकारात्मक परिणाम होत असल्याचं संशोधकांना आढळलं आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. कॅथरीन बुकानन (Kathryn Buchanan) सांगतात की, नकारात्मक सोशल मीडियाला डूमस्क्रोलिंग (Doomscrolling) म्हणतात. यामध्ये, स्टोरीच्या माध्यमातून यूजर्सना अशी फीड दिली जाते, जेणेकरून ते जास्तीत जास्त वेळ त्यांच्या स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपवर नकारात्मक कथा, बातम्या वाचत राहतील.
हे वाचा -
अनोखं Drink! विमानात बनतं अधिकच चविष्ट, मिळतो ‘ढगात’ असल्याचा अनुभव
आरोग्यासाठी चांगले नाही
डॉ कॅथरीन पुढे म्हणाल्या की, सोशल मीडियावर नकारात्मक बातम्यांचा ट्रेंड वाढत आहे. अनेकदा या न्यूज फीडमध्ये सत्यताही (authenticity) नसते. अशा परिस्थितीतही लोक त्यांना मिळणारे ऑनलाइन फीड वाचत राहतात. हे आरोग्यासाठी चांगलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.