• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • 5 लाखांत गाडीचं केलं घर, फिरत्या खोलीतून पूर्ण केली भटकंतीची हौस; पाहा VIDEO

5 लाखांत गाडीचं केलं घर, फिरत्या खोलीतून पूर्ण केली भटकंतीची हौस; पाहा VIDEO

एका जोडप्यानं फिरण्याची (Couple bought van and modified it as a home) हौस भागवण्यासाठी एका व्हॅनचंच घर तयार केलं.

 • Share this:
  लंडन, 7 नोव्हेंबर: एका जोडप्यानं फिरण्याची (Couple bought van and modified it as a home) हौस भागवण्यासाठी एका व्हॅनचंच घर तयार केलं. फिरण्याचा अनोखा छंद एकदा (Hobby of travelling) जडला की लोक प्रवासासाठी काय वाट्टेल ते करतात. काहीही करून घराबाहेर पडता यावं आणि फिरता यावं, यासाठी काय करता येईल, याचा सातत्यानं ते विचार करत असतात. ही गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या लोरा इवांस (New idea of a couple) आणि एड नाईट या जोडप्याची.
  View this post on Instagram

  A post shared by @ourhomethatroams

  कोरोना काळात लढवली शक्कल या जोडप्यला जग फिरण्याची इच्छा आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला होता. मात्र कोरोना संकटामुळं त्यांना आपला बेत गुंडाळून ठेवावा लागला. देशाबाहेर जाता येत नाही, तर देशातच फिरावं आणि आजूबाजूचा भाग पाहून घ्यावा, या उद्देशानं त्यांनी एक सेकंड हँड व्हॅन खरेदी केली. 7 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या व्हॅनची डागडुजी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. 4 महिन्यात कायापालट चार महिने कष्ट करून त्यांनी या व्हॅनचा कायापालट केला. त्यातील बरेचसे भाग बदलले आणि व्हॅनला एखाद्या घराप्रमाणे तयार केलं. कोरोना काळात देशभर फिरण्याचं स्वप्न त्यांनी या कारमधून पूर्ण केलं. चार महिने रोज 8 तास काम करून त्यांनी या व्हॅनचा कायापालट केला. जवळपास 5 लाख रुपये त्यांनी या व्हॅनच्या इंटेरिअरवर खर्च केले. हे वाचा- पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालखी महामार्गाची पायाभरणी, उद्धव ठाकरेही राहणार हजर व्हॅन विकून कमावला नफा कोरोनाचा प्रभाव ओसरून जगभर विमानसेवा सुरु झाल्यानंतर आता त्यांनी ही व्हॅन विकण्याचा निर्णय घेतला. ही व्हॅन विकून अल्पसा नफादेखील कमावला. व्हॅन खरेदी करण्यासाठी लागलेले पैसे आणि त्याच्या डागडुजीचा खर्च पकडून वर काही लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला. त्यामुळे कोरोना काळात फिरण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आणि आता नफ्यासह गाडी विकून पुन्हा जगाची भ्रमंती करण्याचा त्यांचा मार्गही पूर्ण झाला.
  Published by:desk news
  First published: