मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /IIT ते IAS ऑफिसर प्रतिभा वर्मा यांच्या परिश्रमांचा प्रवास; तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश

IIT ते IAS ऑफिसर प्रतिभा वर्मा यांच्या परिश्रमांचा प्रवास; तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश

आयएएस अधिकारी प्रतिभा वर्मा  या सुलतानपूरच्या रहणाऱ्या आहेत

आयएएस अधिकारी प्रतिभा वर्मा या सुलतानपूरच्या रहणाऱ्या आहेत

खाजगी कंपनीत नोकरी, NGO साठी काम पण, तरीही कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न शांत राहू देत नव्हतं. प्रतिभा वर्मा यांनी आयएएस अधिकारी वर्मा (IAS officer Pratibha Verma) होण्याचे ध्येय गाठलंच...

नवी दिल्ली,17 जुलै :  आयएएस अधिकारी प्रतिभा वर्मा (IAS officer Pratibha Verma) या सुलतानपूरच्या रहणाऱ्या आहेत. 2019 मध्ये युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) मेहनतीच्या बळावर 3 रँक मिळवत महिलांमध्ये टॉपर होत्या. सुलतानपूर (Sultanpur) मध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये देखील टॉपर राहिल्या. एनएसएसमध्ये (NSS) असताना त्यांनी आयएएस ऑफिसर (IAS Officer) होण्याचं स्वप्न पाहिलं. बारावी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर त्यांनी आयटी दिल्लीमधून (IIT Delhi) B.Tech डिग्री मिळवली.

ग्रॅज्युएशन नंतर एका खासगी कंपनी मध्ये 2 वर्ष काम केलं. त्यानंतर एका एनजीओमध्ये (NGO) काम करत असताना त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली आणि आपल्या मागे पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी सुरू केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी युपीएससी परीक्षेमध्ये यशही मिळवलं.

(रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महिलेची जिद्द! पूर्ण करून दाखवलं अधिकारी व्हायचं स्पप्न)

प्रतिभा यांना सशक्तिकरण महिला आणि मुलांसाठी ठोस कामगिरी करण्याची मनापासून इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी आयएएस ऑफिसर ऑफिसर (IAS Officer) बनण्याचा निर्णय घेतला. आपल्या यशामध्ये कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिभा वर्मा सांगतात.2017 मध्ये त्यांनी पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली मात्र, त्या प्रिलियम सुद्धा क्लिअर करू शकल्या नाहीत. 2018 ला त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि 289 रँक मिळाल्याने त्यांना इंडियन रेव्हेन्यू सर्विस मधून नागपूरमध्ये (Indian Revenue Service, Nagpur) इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आलं.

(ऑनलाईन शिक्षणांचा मुलांच्या डोळ्यावर होतोय परिणाम?, असा करा बचाव)

मात्र, तरीही प्रतिभा यांचं समाधान झालं नाही IAS बनण्याचं स्वप्न त्यांना खुणावत होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी दुसरा रँक मिळवला.

(ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू; देशातलं पहिलं Grain ATM सुरू)

UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा यांनी ऑप्शनल सब्जेक्ट निवडतांना विचारपूर्वक निवड करण्याचा सल्ला दिलेला आहे. ग्रॅज्युएशनमध्ये ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो तोच ऑप्शनल सब्जेक्ट निवडला तर फायदा होतो असं प्रतिभा सांगतात. प्रतिभा यांनी 3 वेळा UPSC परीक्षा दिली 2 वेळा आलेल्या अपयशाचा अभ्यास करूनच त्यांनी तिसऱ्या वेळी पूर्ण मेहनतीने अभ्यास केला.

First published:
top videos

    Tags: Ias officer, Inspiration, Inspiring story, Success, Success stories, Upsc