मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या डोळ्यांच्या आजारात वाढ? जाणून घ्या आजाराची लक्षणं, करा हा उपाय

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या डोळ्यांच्या आजारात वाढ? जाणून घ्या आजाराची लक्षणं, करा हा उपाय

Childrens Increased eye disease: सध्या व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने मुलांना एकटक मोबाईलकडे बघत बसावं लागतं. त्यामुळे मुलांना डिजिटल आय स्ट्रेन (Digital eye Strain) हा आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे.

Childrens Increased eye disease: सध्या व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने मुलांना एकटक मोबाईलकडे बघत बसावं लागतं. त्यामुळे मुलांना डिजिटल आय स्ट्रेन (Digital eye Strain) हा आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे.

Childrens Increased eye disease: सध्या व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने मुलांना एकटक मोबाईलकडे बघत बसावं लागतं. त्यामुळे मुलांना डिजिटल आय स्ट्रेन (Digital eye Strain) हा आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 15 जुलै: अभ्यासाचं म्हणजे क्रमिक शिक्षण पद्धतीत शिक्षणाचं एक वर्ष वाया गेलं तर करिअर बर्बाद होईल अशी स्थिती आधी होती. पण आता शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यापैकी एक आहे ऑनलाईन शिक्षण. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचं (Online Education) महत्त्व प्रचंड वाढलं. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शाळा-कॉलेजं बंद ठेवण्यात आली आणि बालवाडीपासून पदवीपर्यंत आणि सगळं शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. शाळेतल्या मुलांना तासनतास मोबाईल स्क्रीनवर पाहून अभ्यास करावा लागतो आहे. सध्या दुसरी लाट येऊन गेल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही शाळा बंदच आहेत. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे आयुष्याचा आयामच बदलला आहे. पण यामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढायला लागले आहेत. यासंबंधी आज तक ने वृत्त दिलं आहे.

सध्या व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने मुलांना एकटक मोबाइलकडे बघत बसावं लागतं. त्यामुळे मुलांना डिजिटल आय स्ट्रेन (Digital eye Strain) हा आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे. या आजारात प्रामुख्याने सतत डिजिटल स्क्रीन पाहत राहिल्याने मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो. याच आजाराला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome) असंही म्हणतात.

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ची लक्षणं

तुमचा मुलगा सातत्याने मोबाईल स्क्रीन बघत असेल तर त्याच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सातत्याच्या अभ्यासानं त्याच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो किंवा त्याची झोप कमी होऊ शकते. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम झालेल्या लोकांचे डोळे दुखतात (Pain in eyes), लाल होतात, डोळे ओढल्यासारखं वाटतं, डोळे प्रचंड थकतात, जड होतात कधीकधी तर धुरकट दिसतं. ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत.

साखर तपासण्यासाठी आता नाही टोचावी लागणार सुई; रक्त तपासणीशिवायच कळेल Sugar level

कसा कराल बचाव

या आजारापासून जर तुम्हाला स्वत: च्या मुलांचा बचाव करायचा असेल तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला ऐकला पाहिजे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विपुलकांत केशरी म्हणाले, ‘ जर तुमची मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर पालक म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यायला हवी. अभ्यास करताना मोबाईल आणि त्यांच्या डोळ्यांत किमान एक फुटाचं अंतर राहील याची काळजी घ्या. मोबाईल स्क्रीनचा (Mobile Screen) ब्राइटनेस पण कमी ठेवा. ते ज्या खोलीत अभ्यास करत आहेत तिथं पुरेसा उजेड आहे ना हे पहा. व्यवस्थित उजेड असलेल्या खोलीतच त्यांना अभ्यासाला बसवा. सातत्याने स्क्रीनकडे पाहण्याच्या सवयीमुळे मुलांचा दर मिनिटाला पापणीची उघडझाप करण्याचा दरही मंदावतो त्यामुळे डोळे कोरडे पडतात आणि नंतर डोळ्यांतून पाणी येतं. त्यामुळे डिजिटल उपकरणांचा वापर करताना सतत पापण्यांची उघडझाप करत राहिलं पाहिजे आणि सतत एक दीड तास काम केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं दूरवर असलेल्या वस्तू पहा’ त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी ते पुढे म्हणाले, ‘ असा ब्रेक घेतला की डोळ्यांना हळूवार मसाजही करा. या डिजिटल उपकरणांतून निघणाऱ्या ब्लू स्पेक्ट्रममुळे डोळे थकतात त्यामुळे पापण्यांची उघडझाप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी बाजारात अँटि ग्लेअर चष्मे मिळतात ते वापरले तर डोळ्यांवरचा ताण खूप प्रमाणात कमी होतो.’

कितपत आहे ब्लू स्पेक्ट्रमचा धोका

ते म्हणाले, ‘ब्लू स्पेक्ट्रममुळे (Blue spectrum) डोळ्यांना दीर्घकालीन तोटा होऊ शकतो. पांढऱ्या रंगामध्ये सात रंग सामावलेले असतात. त्यापैकी निळ्या रंगाचा हा स्पेक्ट्रम असतो. सातत्याने त्या स्पेक्ट्रमला डोळे बघत राहिले तर त्रास होऊ शकतो. सध्या डिजिटल उपकरणांचा वापर वाढल्याने ब्लू स्पेक्ट्रमबद्दल चर्चा आहे. अँटि ग्लेअर चष्मे यात काही प्रमाणात फायदेशीर ठरतात.’

COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात? जाणून घ्या यामागची कारणं

घरगुती उपाय कोणते करता येतील?

डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवा असं नेत्रतज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए असलेली आंब्यासारखी फळं खावीत. पपई खाल्ल्यानेही डोळे चांगले होतात. गाजरही डोळ्यांसाठी चांगलं असतं. त्यामुळे पालेभाज्यांसोबतच ही फळंही तुमच्या मुलांना द्या म्हणजे त्यांचे डोळे उत्तम राहतील.

ही काळजी घ्या

मुलांना मोबाईलवर गेम खेळण्यासाठी वेळ ठरवून द्या. तेवढाच वेळ खेळू द्या. मोबाईलचा ब्राइटनेस कमी ठेवायला सांगा. डोळ्यांपासून 25 सेंटिमीटर लांब आणि कमीतकमी 15 ते 20 अंशांच्या कोनात मोबाइल धरूनच तो वापरायला सांगा. तसंच काहीही त्रास झाला तर लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा. त्यासाठी कुठला घरगुती उपाय किंवा मेडिकल स्टोअरमधून आणून ड्रॉप्स वापरू नका असा सल्ला केशरी यांनी दिला आहे.

First published:

Tags: Eyes damage, Online education