मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: रस्त्यावर झाडू मारणाऱ्या तरुणीने पाहिलं स्पप्न; स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन झाली अधिकारी

Success Story: रस्त्यावर झाडू मारणाऱ्या तरुणीने पाहिलं स्पप्न; स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन झाली अधिकारी

आपल्या 2 मुलांच्या पालन पोषणासाठी सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कंडारा यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे.

आपल्या 2 मुलांच्या पालन पोषणासाठी सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कंडारा यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे.

आपल्या 2 मुलांच्या पालन पोषणासाठी सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आशा कंडारा यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे.

जोधपूर, 15 जुलै : अधिकारी (competitive exam success story) होण्याची स्वप्न पाहात स्पर्धा परीक्षांच्या वाटेवर अनेक जण जातात, त्यातले काही स्वतःच्या नशिबाला दोष देत पहिल्याच प्रयत्नात माघार घेतात, काही परिस्थितीला दोष देत दुसरा मार्ग चोखाळतात. पण रस्त्यावर झाडू मारणाऱ्या एका महिलेने अधिकारी (RAS) व्हायचं स्वप्न पाहिलं. जिद्दीने अभ्यास करत प्रतिकूल परिस्थितीत कठीण परीक्षा उत्तीर्ण होत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. अपयशाने खचून जाणाऱ्यांनी ही success story वाचलीच पाहिजे.

राजस्थानमध्ये (Rajasthan)सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाणारी आरएएस परीक्षा 2018 मध्ये  (RAS Exam- 2018) प्रचंड मेहनतीने यशस्वी होणाऱ्या युवकाचं सगळीकडे कौतुक केलं जातं. मात्र यावेळी सफाई कर्मचारी आशा कंडारा  (Sweeper Asha Kandara) यांनी या परीक्षेमध्ये यशस्वी होत एक वेगळेच उदाहरण  घालून दिलेला आहे. आशा कंडारा या जोधपूरच्या महानगरपालिकेच्या उत्तर विभागामध्ये सफाई कर्मचारी (Sweepers in the North Division of Jodhpur Municipal Corporation) म्हणून काम करतात. हे काम करत असतानाच जिद्दीने अभ्यास करत राजस्थानच्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलेला आहे.

आपल्या मेहनतीच्या जोरावर राजस्थानच्या रस्त्यावर साफसफाई करणारी ही महिला आता राजस्थानच्या प्रशासकीय सेवेत (administrative service) सहभागी होणार आहे. परिस्थिती कोणतीही असो मेहनतीने यश मिळवता येतं हे आशा कंडारा यांनी सिद्ध केलेला आहे. राजस्थान लोकसेवा आयोगाच्या 2018 सालच्या आरएएसच्या परीक्षेच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी 728 रँक मिळवल्याचं समजलं आणि त्यांच्या आनंदाला सिमा राहिली नाही.

(देवाच्या परीक्षेसाठी लेकीचा जीव घातला धोक्यात; आईने 193 किमी स्पीडने पळवली कार)

आशा कंडारा यांचं आयुष्य

आपल्या 2 मुलांच्या पालन पोषणासाठी आशा कंडारा सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि दोन मुलांचं चांगलं संगोपन करण्यासाठी त्यांनी संघर्षपूर्ण मेहनत केली आणि या मेहनतीला यशही मिळालं. RAS परीक्षेचे प्रीलियम,मेन्स आणि इंटरव्ह्यूतमध्ये हे तीनही टप्पे त्यांनी पार केले.

(बापरे बाप! ऑनलाईन गेममध्ये मुलानं उडवले 2 लाख रुपये)

स्वप्नांना यशस्वी पंख

8 वर्षांपूर्वी नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर आशा कंडारा आपल्या 2 मुलांसह राहतात. पतीपासून वेगळे झाल्यानंतर मुलांचं पालन-पोषण त्याच करतात. मात्र त्यांनी हिंमत हरली नाही. सफाई कर्मचारी म्हणून महानगरपालिकेमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आपला अभ्यास सुरू ठेवला. महत्त्वाचं म्हणजे आशा यांना महानगरपालिकेमध्ये 12 दिवसांपूर्वीच परमनंट नोकरी मिळालेली आहे.

(मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड)

ऑफिसरला पाहून केला निश्चय

आशा सांगतात की, महानगरपालिकेतील नोकरीसाठी त्या स्कुटीवरून प्रवास करायच्या. ज्या ठिकाणी ड्युटी लावली जाईल त्या ठिकाणी त्या साफसफाई करण्यासाठी जात असतं. मात्र त्याचवेळी ऑफिसर्स ऑफिसमध्ये बसून आपलं काम करतात हे पाहून त्यांच्या मनामध्ये ऑफिसर होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून RAS परीक्षेची तयारी सुरू केली आणि मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलं.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Rajasthan, Success stories, Success story