देशातील पहिले Grain ATM प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालं आहे. एका वेळी पाच ते सात मिनिटांत 70 किलो धान्य हे मशीन वितरित करू शकेल.
पायलट प्रोजेक्ट म्हणून गुरुग्राममध्ये हे धान्याचं ATM सुरू झालं आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, आता धान्य मिळविण्यासाठी ग्राहकांना सरकारी रेशन डेपोसमोर रांगेत उभे रहावे लागणार नाही
हे एक स्वयंचलित मशीन आहे, जे बँकेच्या एटीएमप्रमाणे कार्य करतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित केलेल्या यंत्राला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी म्हणजे धान्य वितरण मशीन असं म्हणतात.
टच स्क्रीन सुविधा असलेलं बायोमेट्रिक मशीन यात आहे. लाभधारकाने आधार किंवा रेशन कार्डचा क्रमांक दिला की धान्य आपोआप बाहेर येईल.
गहू, तांदूळ आणि बाजरी असं तीन प्रकारचं धान्य सध्या या मशीनद्वारे वितरित करता येत आहे. देशात अन्यत्रही अशी धान्य ATM सुरू करण्याचा विचार आहे.