Home /News /lifestyle /

जुलै महिन्यात जन्मलेल्यांचा स्वभाव ओळखणं कठीण; मात्र वेळ पडली तर...

जुलै महिन्यात जन्मलेल्यांचा स्वभाव ओळखणं कठीण; मात्र वेळ पडली तर...

जुलै महिन्यातल्या (July Month) जन्मलेल्या लोकांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. ते सगळ्यांवर प्रेम करतात पण, फसवायालाही मागेपुढे पाहत नाहीत.

    नवी दिल्ली, 05 जुलै : जुलै महिन्यामध्ये (July Month) जन्मलेल्या लोकांचा स्वभाव (Nature) ओळखणं जरा कठीणच असतं . या महिन्यात जन्मलेले लोक मूडी (Moody People) असतात. त्यामुळे यांच्याशी मैत्री करताना जपून करावी. हे लोक पाहता-पाहता कधी हसायला लागतात तर, कधी अचानक त्यांना राग येतो. जुलै महिन्यात जन्म घेतलेले लोक डोक्यापेक्षा मनाने विचार करणारे असतात. हे लोक भित्रे असतात आणि संकटात साथ सोडतात. या महिन्यामध्ये जन्माला आलेले लोक इतरांच्या भावनांचा आदर करतात, सन्मान करतात मात्र, वेळ पडली तर, धोका द्यायलाही कमी करत नाहीत. (साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांनी प्रकृती सांभाळा; कसा जाईल तुमचा आठवडा) या लोकांनी एकदा मनात विचार केला की, त्या गोष्टी तडीस नेतात. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळेच जिद्दी स्वभावाचे असतात. जुलै महिन्यात जन्माला आलेले लोक भांडण-तंटा करत नाहीत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड असतो. (अरे बापरे! वाळवंट नसूनही या गावात थेंबभरही पाऊस पडत नाही; कसे जगतात इथले लोक?) लोकांशीनेहमीच सलोख्याने वागतात. त्यामुळेच त्यांची मैत्री लवकर होते. या महिन्यात जन्माला आलेले लोक कलेच्या क्षेत्रात काम करतात. (केसांच्या सगळ्या समस्या संपवणारे ‘हे’ उपाय; एकदा करूनच पाहा) सिनेमा, मिडिया या क्षेत्रात त्यांनी हात आजमावला तर प्रसिद्धी मिळते. बिजनेसमध्ये यांना यश मिळतं. समाजामध्ये सन्मान प्राप्त करतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या