आज जुलै महिन्यातला पहिला रविवार. दिनांक 4 जुलै. ज्येष्ठ कृष्ण दशमी. जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत वक्री अवस्थेत असून, शनी मकर राशीतून भ्रमण करणार आहे. मंगळ, शुक्र कर्क राशीत राहणार असून 7 जुलै रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथे तो सूर्य सोबत सून बुधादित्य योग करेल. या आठवड्यात गुरू सूर्य नवपंचम योग करीत आहेत. राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहे. 10 जुलै रोजी अमावास्या मिथुन राशीत होणार आहे. वरील सर्व ग्रह स्थिती नुसार या आठवड्याचे राशी भविष्य पाहू. मेष सप्ताहात सुरवातीला प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. तृतीय स्थानातील सूर्य बुध, राजयोग कारक असून पराक्रमाची वाढ करतील. त्याच बरोबर रवि बुध शनी शी षडाष्टक योग करीत आहे.अति साहस नको. चतुर्थ स्थानातील मंगळ आणि शुक्र घरातल्या वस्तूंचा दुरुस्तीचा खर्च ,किंवा नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध अमावस्येच्या प्रभावातून अडचणीचा जाईल. बहीण भावंड काळजी लावतील. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करेल. वृषभ सप्ताहाच्या सुरवातीला राशीतील चंद्र गुरूशी केंद्र योग करेल. कार्य सफल होतील. धनस्थानात येणारा बुध तुम्हाला आनंदी व संपन्न करणार आहे. तृतीय मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र तुमच्या पराक्रमाची वाढ करेल. धार्मिक कामात रुची वाढेल. कार्यक्षेत्रातून उत्तम संधी मिळेल. लाभ होतील. धन, कुटुंब स्थानात होणारी अमावस्या आर्थिक नुकसान किंवा कुटुंबातील व्यक्तीची चिंता दर्शवते. प्रवास योग, नवीन व्यक्तींच्या ओळखी व्यवसाय पूरक असतील. राहू जप करावा. मिथुन या आठवड्यात होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे बुधाचा राशीतील प्रवेश. स्वराशीत येणारा बुध उच्च होऊन उत्तम फळ देईल. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा आदर वाटेल. वाणी चतुर ,आर्जवी होईल. धनस्थानातील शुक्र, मंगळ आर्थिक उलाढाल वाढवतील. शेअर बाजार मध्ये कधी जोरदार उसळी घ्याल पण सांभाळून. 10 जुलै ची अमावास्या प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्या असे सुचवीत आहे. भाग्य स्थानातील गुरू संतती कारक आहे. अष्टमात शनि सावधगिरीचा इशारा देत आहे. शनि उपासना व दान करावे. कर्क अष्टमात गुरू,राशीतील मंगळ,शुक्र, शनिच्या दृष्टीत व्यय स्थानातील रवि बुध, जपून पावले टाका असे सुचवत आहे. हळव्या मनाच्या कर्क व्यक्तींसाठी आठवडा फारसा अनुकूल नाही. दुखापत,पडझड, आजारपण, नुकसान यापासून अगदी जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करू नका. वाद नको. अमावस्येच्या सुमारास सर्व परीने काळजी घ्यावी. शनिदृष्टी मुळे नैराश्यवादी स्वभाव होईल. ईश्वरी उपासना करावी. सिंह हा आठवडा पूर्वार्धात सिंह राशीच्या व्यक्तींना दशमातील चंद्र राहू योगाने थोडा कठीण जाईल. कार्यक्षेत्रातील अडचणी ,ताण वाढतील .वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पैतृक संपत्ती संबंधी निर्णय होईल. अमावास्या थोडी संभ्रमात टाकणारी आहे. राशी स्वामी रवि बुधा सोबत लाभ स्थानात असून शुभ फळ देईल. व्ययस्थानातील शुक्र मंगळ, शनि च्या प्रतियोगात आहे आर्थिक नुकसान संभवते. एकूण मिश्र सप्ताह आहे. गुरूची उपासना करावी. कन्या पूर्वार्ध भाग्यशाली, मनोकामना पूर्ण करणारा आहे. उत्तरार्धात दशमातील रवि बुध काही नवीन संधी मिळवुन देतील. शुक्र लाभ मिळवुन देण्यास तत्पर आहे. अमावास्या मात्र पितृचिंतेची .सध्या कामाच्या ठिकाणी तुमचे नाव होणार आहे. राहू भाग्य स्थानात पितृ दोष निर्माण करतो. संतती चिंता, धार्मिक कार्यात नावड असे फळ मिळू शकतात. अमावस्येला काही दान करावे. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजू चांगली. मिश्र सप्ताह. तुला सप्ताहाच्या मध्यावर मिथुन राशीत प्रवेश करणारा बुध सूर्यासोबत भाग्याचे द्वार उघडणार आहे. दशमातील शुक्र मंगळ कार्यक्षेत्रात मोठी भरारी घेणार आहेत .तुला व्यक्ती. पंचमस्थ गुरू संतती साठी शुभ. अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात जरा जपून. राहू अष्टमात आहे. प्रकृती सांभाळा. आर्थिक स्थिती ठीक राहील .घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. राहूची उपासना, जप करावा. वृश्चिक हा सप्ताह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय जपुन राहण्याचा आहे. पूर्वार्ध चंद्र राहू च्या प्रभावातून मानसिक ताण दर्शवतो. संभ्रम निर्माण होईल. तुम्हाला काही जुने आजार असतील तर अमावस्येच्या आसपास डोके वर काढतील. सप्ताहाच्या मध्यावर अष्टमात येणारे बुध रवि पोटाचे आजार दाखवत आहेत. जास्त श्रम टाळा. आपल्या वाणी वर ताबा ठेवा. भावंडाची नाराजी होइल असे बोलू नका. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. मात्र कुटुंब तुमची साथ देणार हे नक्की. धनु सप्ताहाची सुरवात थोडी संथ गतीने होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून. शत्रू टपले असतील. मध्यावर मिथुन राशीत येणारा बुध जोडीदाराला उत्तम फळ देण्यास तत्पर आहे. अष्टमात असलेले ग्रह शारीरिक त्रास दर्शवतात. अमावस्येच्या सुमारास जरा जपून राहण्याचा संकेत आहे. केतू धार्मिक रुची वाढवणारा आहे. जास्तीची जबाबदारी , प्रवास संभवतात. मकर हा सप्ताह रवी शनि षडाष्टक योग करीत आहेत. सुरवातीला होणारा चंद्र राहू योग संतती चिंता दर्शवतो. आर्थिक बाजू गुरू महाराज समर्थपणे सांभाळतील. जोडीदार रागवू नये याची काळजी घ्या. अमावास्या काळात ईश्वरी उपासना करीत रहा. मुलांची काळजी घ्या. काहींना अचानक उष्णतेचे विकार त्रास देतील. सप्ताह मध्यम आहे. कुंभ आठवड्याचा पूर्वार्ध घरासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर चांगला आहे. मंगळ कर्क राशीत नीच अवस्थेत आहे. रक्तदाब, मधुमेह असणार्यांनी जपून रहा. कोणाशी जास्त बोलणे टाळा. डोळ्याचे विकार संभवतात. शनि उपासना करावी.मिथुन राशीत येणारा बुध संतती साठी शुभ आहे. पण अमावस्येच्या सुमारास मुलांना जपा. मीन गृहसौख्य सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या आठवड्यात होणारी अमावास्या त्याला धक्का लावणार नाही इकडे लक्ष द्या. भावंडाची काही अडचण ,प्रश्न असेल तर मदत करावी लागेल. कला क्षेत्रात उत्तम प्रगती संभवते. धार्मिक गोष्टीवर खर्च, तीर्थ स्थानी प्रवास, संभवतात कार्य सिद्धीस जाईल .आर्थिक घडामोडी होतील. गुरूची उपासना करावी. शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.