ऑयली केसांपासून सुटका मिळवण्यासाठी एसेंशियल ऑईल वापरा केसांना शॅम्पू लावण्याआधी केसांना एसेंशियल ऑईल (Essential Oil) लावावं. एक मोठा चमचा पाण्यात 10 थेंब एसेंशियल ऑईल टाकून केसांना लावा.
खोबरेल तेल लावण्याने केसांना फायदा होतो. त्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. नारळाचं तेल आणि लिंबाचा रस एकत्र करा. त्यात 4 ते 5 चमचे लवेंडर ऑईल टाकून लावा. 4 ते 5 तसांनी पाण्याने धुवा.
केस धुतल्यानंतर पाण्यात ऍपलसायडर व्हिनेगर मिक्स करा. हे पाणी केसांवर टाका. यामुळे केसांचा तेलकटपणा कमी होऊन केस चमकदार होतील.
ऑयली केस धुवताना शॅम्पूचाही योग्य प्रकारे वापर करावा. जास्त शॅम्पू वापरल्यानेही केसांना हानी पोहचते. शॅम्पू केसांच्या वरच्या भागात लाऊन कंगव्याने पसरवा.
ऑयली केसांसाठीही कंडीशनर लावायला हवं. पण, कंडीशनर केसांच्या मुळांना न लावता केवळ खालच्या भागाला लावावं. माईल्ड कंडीशनर वापरणं चांगलं. पण, हेअर मास्क लाऊ नयेत.
सतत विंचरण्यामुळे केसांमध्ये जास्त प्रमाणात सीबम वाढतं. केसांसाठी हेअर ब्रश वापरून केस मोकळे करावेत.
केसातल कोंडा दूर झाला तर, केस गळण्याचीही समस्या कमी होते. त्यासाठी चांगाल शॅन्पू वापरावा किंवा घरगुती उपाय करावेत.
एरंडेल तेलाचा वापर ऑयली केसांवर अजिबात करु नये. केसांच्या वाढीसाठी चांगलं असणारं हे तेल केस ऑयली असताना लावल्यास ते आणखीन तेलकट होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू वापरु नयेत.