अरे बापरे! वाळवंट नसूनही या गावात थेंबभरही पाऊस पडत नाही; कसे जगतात इथले लोक?
एखाद्या गावात पाऊसच पडत नाही (No Rain) असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण, हे खरं आहे.
|
1/ 6
देशाच्या अनेक भागात पावासाला सुरूवात झाली आहे. मेघालय सारख्या राज्यांमध्ये मौसीनराम गावात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मात्र जगात काही अशी गावं आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही.
2/ 6
हे गाव येमेनमध्ये आहे. या भागात कोणतही वाळवंट नाहीये. येमेन देशाची राजधानी सनाच्या पश्चिमेला मनख निदेशालय हजर क्षेत्रात अल-हुतैब नावाचं हे गाव आहे.
3/ 6
या भागात नेहमीच पर्यटक येत असतात. टेकडीच्या उंचावर इथे अतिशय सुंदर घरं बांधलेली आहेत. ही घरं आणि इथलं निसर्गसौंदर्य डोळ्यांच पारणं फेडणारं आहे.
4/ 6
अल-हुतैब हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3,200 मीटर उंचीवर आहे. पाऊस नसल्याने इथलं वातावरण उष्ण असलं तरी थंडीमध्ये बराच गारवा असतो.
5/ 6
ग्रामीण आणि शहरी भागांच्या प्राचीन आणि आधुनिक वास्तूकलेचा नमूना या गावाच्या रचनेत पहायला मिळतो. इथे यहुदी लोकांचं वास्तव्य आहे. 'अल-बोहरा’ किंवा ‘अल-मुकरमा' नावाने ते ओळखले जातात.
6/ 6
अल-हुतेब गाव इतक्या उंचावर वसलेलं आहे की ढगही याच्या खालीच राहतात. त्यामुळे गावाच्या खालच्या भागात पाऊस पडून जातो.