मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पुढचे 3 वर्षे ‘या’ 4 राशींसाठी सुखाचा काळ; मिळणार शनिदेवांची कृपादृष्टी

पुढचे 3 वर्षे ‘या’ 4 राशींसाठी सुखाचा काळ; मिळणार शनिदेवांची कृपादृष्टी

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

शनिदेवाची वक्रदृष्टी पडली तर,अनेक राशी संकटात पडतात.

साडेसातीच्या काळात शनिदेव (Shani Dev) आपल्या कर्मांचं फळ आपल्या पदरात टाकतात. पण, पुढच्या 3 वर्षांमध्ये काही राशींची (Zodiac Sing) साडेसाती किंवा पनौतीमधून सुटका होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,04 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) शनी (Shani) ग्रहाला अत्यंत महत्त्व आहे. शनी ग्रह मकर आणि कुंभ राशीचा (Zodiac Sing)  स्वामी आहे. तर,तुळ राशीवर शनिची कृपा असते. तर मेष रास शानिची निच्च रास मानली जाते. शनि एखाद्या राशीमध्ये अडीच वर्षे राहतात.

या काळामध्ये या राशीसाठी ग्रहांची गती मंद होते. शनी दशा साडेसात वर्षांची असते. ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology) शनी क्रूर ग्रह मानला जातो. मात्र शनि कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्रास देत नाहीत. शनि न्यायाची देवता आहे आणि आपल्या कर्मांचा हिशोब आपल्या पत्रामध्ये टाकत असते. पुढच्या 3 वर्षांमध्ये काही राशींवर मात्र शनीची चांगली कृपा असणार आहे.

(Chanakya Niti: सर्वशक्तीमान होण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी; अडचणींवर होईल)

सध्या शनि मकर राशीमध्ये आहे. त्यामुळे मिथुन आणि तुळ राशीवर शनीची पनौती सुरू आहे तर, धनु, मकर आणि कुंभ राशीसाठी साडेसाती आहे. एकूण 5 राशींवर शनीची दृष्टी पडलेली आहे.11 ऑक्टोबरपर्यंत शनि मकर राशिमध्ये वक्री असणार आहे.

2022 ते 2024 पर्यंत 4 राशींना शनिचा कोणताही त्रास नसेल. मेष, वृषभ, सिंह आणि कन्या राशीवर शनीची वक्रदृष्टी पडेल.

(बिहारची ‘सुपर कॉप’ नवज्योत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी)

29 एप्रिलला शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. ज्यामुळे कर्क आणि वृश्चिक राशीवर पनौती सुरू होणार आहे तर, मिथुन आणि तुळ राशीची पनौती संपणार आहे. मीन राशीसाठी या काळामध्ये साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. मकरसाठी शेवटचा टप्पा तर, कुंभ राशीसाठी दुसरा टप्प्याची साडेसातीचा सुरू होणार आहे. धनु राशीची साडेसाती मधून सुटका होणार आहे. 2022 ला 12 जुलैपासून शनी मकर राशीमध्ये येतील शनी 17 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशी मध्ये असतील.

(‘या’ राशीचा पती मिळाला तर,रहाल सुखात; होईल प्रेमाची बरसात)

त्यामुळे मिथुन, तूळ आणि धनु राशीवर परत शनीची वक्रदृष्टी होणार आहे. 2022 पर्यंत मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे. 2023 मध्ये कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर ती शनीची पनौती सुरू होणार आहे तर, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा परिणाम दिसेल. 2024 ला कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची वक्रदृष्टी असणार आहे.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark