मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /‘या’ राशीचा पती मिळाला तर,रहाल सुखात; होईल प्रेमाची बरसात

‘या’ राशीचा पती मिळाला तर,रहाल सुखात; होईल प्रेमाची बरसात

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)3 राशीची मुलं जोडीदार म्हणून मिळाल्यास ती मुलगी खरोखरच भाग्यवान ठरते.

दिल्ली, 03 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. राशी ग्रहानुसार त्या राशीचा स्वभाव आणि त्यांचे गुणही ठरत असतात. सगळ्याच राशीमध्ये (Zodiac Signs)  काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. राशीनुसार प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. इतकचं नाही तर, आपला जोडीदार कसा असणार हे देखील आपल्या राशीनुसार ठरत असतं.

12 राशींपैकी काही अशा राशी आहेत ज्यांचा जोडीदार मिळणं भाग्यच समजलं जातं. राशीचक्रामधल्या 12 राशींपैकी (12 Zodiac Signs) 3 राशींची मुलं या सर्वोत्तम पती (Best Husband) होऊ शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगत (According to Astrology). या 3 राशींची मुलं पती म्हणून लाभणं अत्यंत भाग्यदाय मानलं जातं. या राशीची मुलं आपल्या जोडीदारावर प्रचंड प्रेम करतात. त्याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींची काळजी घेतात. जाणून घेऊयात या 3 राशीबद्दल.

(फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ कधीपर्यंत खाण्यायोग्य असतात माहिती आहे का?)

कर्क रास

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीची मुलं अत्यंत प्रेमळ पती असतात. त्यांच्यामध्ये परफेक्ट जोडीदार होण्याचे सगळे गुण असतात. आपल्या कमिटमेंट नेहमी पूर्ण करतात. आपल्या जोडीदारावर इमानदारीने प्रेम करतात. त्यांची कधीच फसवणूक करत नाहीत. यांच्याबरोबर एकदा नातं जुळल्यानंतर हे नातं कायम टिकतं. त्यामुळे कर्क राशीचा प्रियकर असेल तर त्यांचं नातं लग्नापर्यंत जातं. कर्क राशीचे लोक आपल्या जोडीदाराला कायम सुखी ठेवतात.

(तुम्हालाही अजून मूल होत नाही आहे; का होतेय Infertility ची समस्या?)

तुळ रास

या राशीची मुलं खुप रोमँटिक आणि केअरिंग स्वभावाचे असतात. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवून त्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलांची काळजी घेतात, जोडीदाराला सरप्राईज देण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळ राशीचे लोक कमिटेड आणि इमानदार असतात. त्यामुळे या राशीची मुलं उत्तम जोडीदार सिद्ध होतात.

(कोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास? पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय)

वृश्चिक रास

वृश्चिक राशीची मुलं अत्यंत बुद्धिमान आणि उदार स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी इतर गोष्टींपेक्षा प्रेम महत्त्व जास्त असतं. त्यामुळेच आपल्या प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि केअरिंग असतो. आपल्या प्रेमीकेवर इतकं प्रेम करतात की तिच्या मनातल्या गोष्टी ती सांगता ते ओळखू शकतात. त्यामुळेच प्रेयसी किंवा पत्नीच्या प्रत्येक इच्छांची काळजी घेऊन त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. . (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark