मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बिहारची ‘सुपर कॉप’ नवजोत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी

बिहारची ‘सुपर कॉप’ नवजोत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी

नवजोत सिमी यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्ये झालं.

नवजोत सिमी यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्ये झालं.

IPS अधिकारी नवजोत सिमी (IPS officer Navjot Simi) यांचा बिहारमध्ये दबदबा आहे. त्या सोशल मीडियावर (Social Media) खुप अ‍ॅक्टिव्ह आहेत. इंस्टाग्रामवर (Instagarm) त्यांना 7.5 लाख फॉलोअर्स आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,03 ऑगस्ट : नवजोत सिमी यांनी 2017 साली 735वा रॅंक मिळवत IPS अधिकारी (IPS officer  Navjot Simi) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आत्तापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. पटनामध्ये त्यांच ट्रेनिंग पूर्ण (Training at Patna) केले आहे. सिमी सोशल मीडियावर  (Social Media) खुप अ‍ॅक्टिव्ह आहेत. इंस्टाग्रामवर  (Instagarm) त्यांना 7.5 लाख फॉलोअर्स आहेत. त्या आपले नवनवीन फोटो शेअर करत असतात.

नवजोत सिमी यांचा जन्म पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये 21 डिसेंबर 1987 साली झाला आहे. नवजोत यांचं सुरुवातीचं शिक्षण पंजाबमध्ये झालं. IPS अधिकारी होण्याआधी नवज्योत यांनी डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण केलं. 2010 मध्ये त्यांनी लुधियानाच्या बाबा जसवंत सिंह डेन्टल कॉलेज (Baba Jaswant Singh Dental College,Ludhiana) मधून डेन्टल सर्जरीची डिग्री मिळवली आहे.

(वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम)

नवजोत सिमी यांनी पश्चिम बंगाल कॅडरचे IAS अधिकारी तुषार सिंगला यांच्याशी  गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केलं. त्यांचे पती तुषार सिंगला हे देशातले प्रसिद्ध IAS अधिकारी आहेत. ते 2015 साली UPSC परिक्षा पास होत IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला.

(Vastu Tips: पतीपत्नीच्या भांडणांना वास्तूदोष असू शकतो कारण; हे उपाय करून पहा)

आपल्या देशामध्ये यूपीएससी परीक्षेला (UPSC Exam) प्रचंड महत्त्व आहे. या परीक्षेची तयारी विद्यार्थी जीव तोडून करतात. मात्र, फार कमी मुलांना यश मिळतं.

(जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?)

UPSCची तयारी करण्यासाठी नवज्योत सिमी यांनी आपली डॉक्टरही सोडलेली. त्यांच्यासारखाच ध्यास मनामध्ये असेल तर, देशांमधील सर्वोच्च अधिकारी होण्याचं स्वप्न कोणीही पूर्ण करू शकतं.

First published:

Tags: Inspiring story, IPS Officer, Success story, Upsc exam