जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Malaika Fitness Routine : 48 व्या वर्षीही फिट आहे मलायका, तुम्हीही फॉलो करू शकता हे फिटनेस रुटीन

Malaika Fitness Routine : 48 व्या वर्षीही फिट आहे मलायका, तुम्हीही फॉलो करू शकता हे फिटनेस रुटीन

Malaika Fitness Routine : 48 व्या वर्षीही फिट आहे मलायका, तुम्हीही फॉलो करू शकता हे फिटनेस रुटीन

वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका तरुण कलाकारांना टक्कर देते. बी-टाऊनमधील सर्वात फिट आणि यंग दिसणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. फिटनेस मागचे रहस्य काय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलीवूड दिवा मलायका अरोरा तिच्या चाहत्यांना नेहमीच शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन आणण्यासाठी निरोगी दिनचर्या पाळण्याचा, योग्य खाण्याचा आणि योगा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देते. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य समाधानी आणि निरोगी होते.

News18

वयाच्या 48 व्या वर्षीही मलायका तरुण कलाकारांना टक्कर देते. बी-टाऊनमधील सर्वात फिट आणि यंग दिसणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. फिटनेस मागचे रहस्य काय? मलायकाच्या दैनंदिन दिनचर्येतून आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करू शकतात: योगा, कसरत, स्ट्रेचिंग तुम्ही इंस्टाग्रामवर मलायकाला फॉलो केल्यास, तुम्हाला कळेल की, तिचे फीड तिच्या योगा आणि वर्कआउटच्या वेडाचे प्रमाण सांगते. अभिनेत्याने तिच्या दिवसाची सुरुवात योगा आसनांनी करणे पसंत करते. त्याचबरोबर तिला धावायला जाणे आणि जिमला जाणेदेखील तितकेच आवडते.

Health Tips: टाचांच्या भेगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; पाय होतील मुलायम

काही दिवसात मलायका HIIT (high-intensity training sessions) देखील निवडते. आपल्या सर्वांप्रमाणेच काहीवेळा तिलाही रोजचे लांबलचक फिटनेस रुटीन फॉलो करण्याचा कंटाळा येतो. तेव्हा ती जास्त प्रमाणात स्ट्रेचिंग करून तिचा व्यायामाचा कोटा पूर्ण करते. भरपूर पाणी पिणे मलायका तिच्या दिवसाची सुरुवात पाणी किंवा डिटॉक्स ड्रिंकने करण्यास प्राधान्य देते. ती सहसा एक कप कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळते किंवा जीरा पाणी किंवा अगदी साधे पाणी घेते. दिवसभर ती तिचे शरीर हायड्रेटेड असल्याची खात्री करते. तिच्या एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, मलायकाने पाणी पिण्याची योग्य पद्धत शेअर केली आहे, जी तिच्या मते उर्जेचा साधा आणि सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे. यामध्ये मालयकाने तिच्या चाहत्यांना उभे राहून पाणी पिण्याऐवजी बसून पाणी पिण्याचा सल्ला दिला.

जाहिरात

योग्य आहार घ्या ETimes सोबतच्या चॅटमध्ये, मलायकाने शेअर केले की ती योग्य प्रकारचा लंच घेते, ज्यामध्ये थोडे कार्ब आणि चांगले फॅट्स जसे की चिकन आणि तांदूळ, संपूर्ण धान्य किंवा भाज्या यांचा समावेश आहे. ती पुढे म्हणाली, “मी संध्याकाळी स्नॅक्स म्हणून काहीतरी खाते, एक अतिशय हलका, निरोगी नाश्ता आणि मी माझे रात्रीचे जेवण 7 वाजेपर्यंत करते” रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे झोपेचं खोबरं होतंय? करू शकता हे घरगुती उपाय मलायकाने असेही सुचवले की रात्रीचे जेवण थोडेसे असावे. भाज्या, किंवा जर कोणी मांसाहारी असेल तर मांस, अंडी किंवा थोड्या शेंगा किंवा डाळी. ज्या दिवशी मलायका रात्रीचे जेवण हलके ठेवायचे असते, तेव्हा ती उकडलेल्या भाज्या किंवा सॅलडच्या प्लेटसह एक वाटी सूप घेते. “मी सर्व अन्न दिवसभरात वाटून घेते आणि शक्य तितके पौष्टिक जेवण करण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळी 7 नंतर मी काहीच खात नाही,” ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात