जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips: टाचांच्या भेगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; पाय होतील मुलायम

Health Tips: टाचांच्या भेगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; पाय होतील मुलायम

Health Tips: टाचांच्या भेगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; पाय होतील मुलायम

Health Tips: टाचांच्या भेगांपासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; पाय होतील मुलायम

Home Remedies on Cracked Heels: त्वचा योग्य पद्धतीने मॉश्चराइजन केल्यास त्वचेतला ओलावा कायम राहत नाही आणि त्यामुळे पायांच्या टाचा कोरड्या पडू लागतात. त्यामुळेच टाचांना भेगा पडत असतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 27 ऑगस्ट: अस्वच्छ आणि भेगा पडलेल्या किंवा फाटलेल्या टाचा लपवण्याची वेळ बऱ्याच जणांवर येते. तसं पाहायला गेलं, तर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे टाचांकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे भेगा वाढतच जातात. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या जाणवते. या काळात टाचांचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. काही घरगुती उपाय करून टाचा स्वच्छ, सुंदर ठेवता येऊ शकतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. टाचांना भेगा पडणं किंवा टाचा फाटण्याची समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. जास्त काळ उभं राहणं, अनवाणी चालणं आणि टाचांची योग्य निगा राखली गेली नाही तर ही समस्या उद्भवते. त्वचा योग्य पद्धतीने मॉश्चराइज न केल्यास त्वचेतला ओलावा कायम राहत नाही आणि त्यामुळे पायांच्या टाचा कोरड्या पडू लागतात. त्यामुळेच टाचांना भेगा पडत असतात. काही घरगुती उपाय केल्यानं फायदा (Home Remedies on Cracked Heels) होऊ शकतो. पॅराफिन मेण वापरल्याने त्वचेतला ओलावा राहील कायम- पायांच्या टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका पाहिजे असल्यास पॅराफिन मेणाचा (Paraffin Wax) चांगला उपयोग होऊ शकतो. या मेणात नैसर्गिक महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्वचा मऊ (Soft Skin) राहण्यास मदत होते. पॅराफिन मेण त्वचेवर लावल्यास त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते. त्वचेतल्या मृत पेशी (Dead Skin Cells) नाहीशा करण्यासाठीही याची मदत होऊ शकते. 2 चमचे मेण घेऊन ते एका वाटीत गरम करावं. त्यानंतर त्यात एक छोटा चमचा हळद मिसळावी. टाचांना ते मिश्रण लावण्याआधी टाचा स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर कापसाचा बोळा करून ते मिश्रण पायांना लावावं. भेगांमध्ये ते मिश्रण योग्य पद्धतीने लावले जाईल याची खात्री करायला हवी. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी टाचा धुऊन घ्याव्यात. त्यानंतर टाचांना तेल लावून त्यांना मॉइश्चराइज करून घ्यावं. शिया बटरचाही होऊ शकतो फायदा- टाचांच्या भेगांसाठी शिया बटरही (Shea Butter) फायदेशीर ठरू शकतं. रुक्ष झालेली त्वचा मृदू बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. यात अँटीबॅक्टेरियल (Antibacterial), अँटिफंगल (Antifungal) आणि अँटीऑक्सिडंट (Antioxidant) गुण असतात. कुठल्याही फंगल इंफेक्शनपासून वाचण्यासाठी याची मदत होते. रात्री झोपण्याआधी काही वेळ पाय गरम पाण्यात ठेवावेत. त्यानंतर ते सुकले की 2 मोठे चमचे शिया बटर गरम करावं. ते थंड झाल्यानंतर कापसाच्या बोळ्यात बुडवून भेगा पडलेल्या टाचांना ते लावावं. दररोज ही कृती केल्यास टाचांची त्वचा मऊ होईल आणि पायांची रुक्ष त्वचाही चमकू लागेल. **हेही वाचा-** रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे झोपेचं खोबरं होतंय? करू शकता हे घरगुती उपाय मध आणि हळदीचं मिश्रण ठरेल गुणकारी- जखम भरून काढण्यासाठी मध आणि हळदीचं मिश्रण फार गुणकारी ठरतं. मधामुळे जखम भरून काढण्यासह ती स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होतो, असं काही संशोधनातून समोर आलं आहे. हळदीमुळे त्वचेला आतपर्यंत पोषण मिळत असतं. सुरुवातीला 1 मोठा चमचा मध, ग्लिसरीन आणि 1 छोटा चमचा हळद घ्यावी. मध, ग्लिसरीन आणि हळदीचं मिश्रण एका वाटीत तयार करावं. त्यानंतर पाय गरम पाण्यात 10 मिनिटांपर्यंत ठेवावेत. पाय सुकले की तयार केलेलं मिश्रण टाचांना लावून ठेवावं. सॉक्स घालून रात्रभर ते मिश्रण तसंच पायांना लावलेलं राहू द्यावं. सकाळी पाय धुऊन टाकावेत. दरम्यान, बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन, हाय ब्लड शुगर, हायपोथायरॉइड, स्थूलता किंवा वृद्धत्वामुळे पायाच्या टाचांना भेगा पडतात. पायांच्या टाचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान दोनदा तरी घरगुती उपाय करून यापासून आराम मिळवता येऊ शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात