• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास? पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय

कोरड्या वातावरणात त्वचेला होतोय त्रास? पावसाळ्यात करा ’हे’ घरगुती उपाय

त्वचा निघत असेल तर, क्लिन्जर लावायला हवं.

त्वचा निघत असेल तर, क्लिन्जर लावायला हवं.

पावसाळा (Monsoon) सुरू झाला की हातापायांवरची त्वचा कोरडी (Dry Skin) झाल्यामुळे निघू लागते. ज्यांना हा त्रास होतो त्यांना बाहेर वावरतानाही लाज वाटतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : उन्हाळ्यानंतर सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे (Monsoon) हवेत गारवा निर्माण झाला की, एक आल्हाददायक वातावरण (Atmosphere) तयार होतो. त्यामुळे पावसाळा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण,पावसामुळेच काही समस्याही (Problem) निर्माण होतात. ओलाव्यामुळे वाढायला लागलेल्या व्हायरसमुळे इन्फेक्शनचा (Virus Infection) धोका तर वाढतोच. शिवाय त्वचेचे विकारही (Skin Problem) व्हायला लागतात. पावसाळ्यात त्वचा कोरडी झाल्यामुळे हात आणि पायांच्या तळव्यावरची त्वचा निघायला लागते. यामुळे त्वचेची आग होणं, हात अवघडल्या सारखं वाटणं,खरबरीत होणं हे त्रास होतात. काहीजणांना हा त्रास जास्त होतो. काही दिवसांनी त्रास थांबतो पण, या काळात बाहेर वावरताना लाज वाटते. यासाठी उपचार म्हणून काही घरगुती उपाय (Home Remedies) वापरता येऊ शकतात. मॉश्चरायझरचा वापर हात किंवा पायाला मॉश्चरायझर लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि हात मऊ होतील. मॉश्चरायझर वापराताना ते सुवास नसलेलं वापरावं. (आता तरी ऐका! फ्रुट सॅलड अजिबात खाऊ नका; आधी ऋजुता दिवेकरचा हा Video पहा) सुवास नसलेलं क्लिन्जर त्वचा निघत असेल तर, क्लिन्जर लावायला हवं. मात्र सुंगधरहित बॅक्टेरीया कमी करणारं चांगल्या गर्जाचं क्लिन्जर वापरावं. त्वचेवर लावून पुसून टाकावं यामुळे काही प्रमाणात त्वचेला फायदा होऊ शकतो. कोमट पाण्याने आंघोळ करा किमान 5 मिनटं कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचा लवकर कोरडी होणार नाही. शिवाय कोमट पाण्यामुळे त्वचेवरच अतिरिक्त तेल कमी होईल. जास्त गरम पाण्यामुळे स्किन ड्राय होते. (Vastu Tips: पतीपत्नीच्या भांडणांना वास्तूदोष असू शकतो कारण; हे उपाय करून पहा) मध वापरा त्वचे संबंधी अनेक विकार बेर करण्यासाठी मध वापरलं जातं. मधात अनेक औषधी गुणधर्म असतात. स्किल इन्फेक्शन कमी करण्याचं कामही मध करू शकतं. इन्फेक्शन झालं असेल तर, लढण्याची ताकद वाढवतं. पावसाळ्याच त्वचा सेन्सेटिव्ह झाली असेल तर, बरी होते. मध हातावर किंवा पायावर लावा. (निकोप वाढीसाठी, नको फक्त अभ्यास; खेळू द्या अंगणात) आहाराकडे लक्ष द्या आहाराबद्दलच्या काही सवयी त्वचेच्या समस्या निर्माण करतात. त्यामुळे पावसाळ्यात बॅलन्स डाएट घ्या. आहारात मासे, आळशी, सब्जा, ड्रायफ्रुटचा समावेश करा. (गर्भधारणेच्या काळात ‘या’ पद्धतीने खावेत बदाम; होईल बाळाला फायदा) उन्हापासून संरक्षण सुर्याच्या UV किरणांपासून त्वचेचं संरक्षण करा. उन्हामुळे त्वचेच नुकसान होतं. त्यामुळे उन्हात बाहेर जाणं टाळा. भरपूर पाणी प्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. दिवसभरात पाणी किंवा ज्युस पिण्यावर भर द्या.
  Published by:News18 Desk
  First published: