नवी दिल्ली, 26 एप्रिल : आठवड्याच्या प्रत्येक दिवसावर एका ग्रहाचे राज्य असते, असे म्हणतात. हे संबंधित ग्रह त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या गुणांची खोल छाप सोडतात. ज्या दिवशी ती व्यक्ती जन्मली त्या दिवसाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीचे वर्तन आणि त्याचे चारित्र्यही अवलंबून असते. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, जन्मलेल्या दिवशी असलेल्या वारावरून व्यक्तीचा स्वभाव काय आहे याबद्दल (Astrology Tips) जाणून घेऊया.
सोमवारी जन्मलेले लोक बोलण्यात गोड -
सोमवारी जन्मलेली व्यक्ती चंद्राच्या प्रभावामुळे बुद्धिमान आणि शांत असते. हे लोक आपल्या गोड आवाजाने इतर लोकांना सहज मोहित करतात. असे लोक स्थिर स्वभावाचे असतात आणि सुख-दु:खात समान वागतात.
मंगळवारी जन्मलेले लोक कुटुंबाचे नाव रोशन करतात -
मंगळवारी जन्मलेले लोक मंगळाच्या प्रभावामुळे गुंतागुंतीच्या स्वभावाचे असतात, इतरांच्या कामात चुका काढतात, युद्धप्रेमी, पराक्रमी असतात, आपला शब्द पाळतात आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करतात.
बुधवारी जन्मलेल्या लोकांना अभ्यासात रस असतो -
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे बुधवारी जन्मलेले लोक गोड बोलणारे, अभ्यासात रस घेणारे, जाणकार, लेखक आणि श्रीमंत असतात. ते इतर लोकांवर सहज विश्वास ठेवत नाहीत.
गुरुवारी जन्मलेल्या लोकांना सन्मान मिळतो -
या दिवशी जन्मलेली व्यक्ती गुरूच्या प्रभावामुळे विद्येत कुशल, धनवान, ज्ञानी, विवेकी आणि उत्तम सल्लागार असतात. हे लोक इतरांना उपदेश करण्यात नेहमीच पुढे असतात. त्याचबरोबर त्यांना लोकांकडून मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळण्याची तीव्र इच्छा असते.
हे वाचा - Horoscope : ज्याची प्रतीक्षा होती ते घडणार; निसटून गेलेली ती संधी पुन्हा मिळणार
शुक्रवारी जन्मलेले लोक स्वभावाने चंचल -
शुक्रवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात, भौतिक सुखांमध्ये मग्न असतात, वाद घालण्यात बुद्धिमान, धनवान आणि शुक्राच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धी असलेले असतात. या लोकांचा देवावर विश्वास कमी असतो.
शनिवारी जन्मलेले लोक गंभीर स्वभावाचे -
शनिवारी जन्मलेले लोक कठोर स्वभावाचे, पराक्रमी, कष्टाळू, दुःख सहन करण्याची अद्भुत शक्ती असलेले, शनीच्या प्रभावामुळे स्वभावाने न्यायी आणि गंभीर असतात. सेवेमुळे या लोकांना प्रसिद्धीही मिळते.
हे वाचा - World Malaria Day: मलेरिया जीवघेणा ठरू शकतो; आयुर्वेदिक उपचारांनी अशी घ्या काळजी
तेजस्वी आणि गुणवान असतात रविवारी जन्मलेले -
रविवारी जन्मलेली व्यक्ती तेजस्वी, हुशार, सदाचारी, उत्साही, दानशूर, पण सूर्याच्या प्रभावामुळे थोडा गर्विष्ठ आणि पित्त स्वभावाची असते. रविवारी जन्मलेल्यांना खूप राग येतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.