सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 एप्रिल 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) कंपनीतल्या प्रभावशाली व्यक्तींशी तुमचं प्रोफेशनली चांगले जुळेल. काही व्यक्तींना होमसिक वाटत असेल, तर घरी जाऊन येण्यासाठी हा चांगला काळ आहे. तुम्ही ज्या प्रसंगाची वाट पाहत होतात, तो घडण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - The moon वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्हाला अधिक लवचिक वाटेल. भावनिकदृष्ट्या तुमचं त्यांच्यावर नियंत्रण हवं, अशी गरज तुमच्या जोडीदाराला वाटत आहे. विनाकारण वेळ वाया घालवणं टाळा. कारण त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकेल. LUCKY SIGN - A new leaf मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) नुकत्याच घडलेल्या एखाद्या ट्रिपमुळे तुम्हाला आणखी काही ट्रिप्सचं प्लॅनिंग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमच्या जुन्या संपर्कातल्या व्यक्तींशी पुन्हा संपर्क साधायला सुरुवात कराल. एखादं नवं आव्हान तुम्हाला बिझी ठेवेल. LUCKY SIGN - A feather कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या जुन्या कृती तुम्हाला पुन्हा दिसू लागतील. कामात पर्फेक्शन येण्यासाठी तुम्ही काही काळ बाजूला राखून ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला घरी एखादी खास वर्कस्पेस तयार करायची असेल, तर ती तुम्ही आत्ता करू शकता. LUCKY SIGN - A sunflower सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दानधर्माची एखादी संधी तुमच्यासमोर चालून येईल. घरी वाद झाले असतील, तर ते सोडून द्या. तुमची मुलं तुमच्यासाठी काही तरी खास प्लॅन करतील. LUCKY SIGN - A pair of slippers कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) प्रॅक्टिकल असण्याचे काही तोटेही असतात. तुमच्या अॅटिट्यूडमुळे तुमच्या जवळची एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. अंमलात आणता येऊ शकेल, असं कामाचं नवं वेळापत्रक तयार करण्यासाठी दिवस चांगला आहे. LUCKY SIGN - A ceramic bowl तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आतून वाटणाऱ्या मोठ्या भीतीपासून सुटका. आतापर्यंत तुम्ही टाळत असलेल्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा तुम्हाला होईल. एखादा किरकोळ रॅश किंवा त्वचेची अॅलर्जी यांमुळे तुम्हाला त्रास होईल. LUCKY SIGN - A candle stand वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्याबद्दलच्या काही अफवा फिरत आहेत. तुम्हाला त्याबद्दल काही जणांकडून कळेल. भूतकाळात येऊन गेलेली एखादी संधी पुन्हा येऊ शकेल. मुलांकडे नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्यावं लागेल. LUCKY SIGN - A garden धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) जुन्या संपर्कातल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्याचा विचार मनात असेल, तर तुम्ही ते करू शकता. जुन्याच रूटीनमध्ये तुम्हाला नवा उत्साह वाटू शकेल. आरोग्याला प्राधान्य द्याल. तुम्ही नवं वेलनेस रूटीन आखाल. LUCKY SIGN - A yellow sapphire मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) प्रत्येकच दिवसाची सुरुवात करताना एखाद्याला ताजंतवानं वाटतंच असं नाही. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे पुन्हा पाहण्याच्या, तिचा आढावा घेण्याच्या मनःस्थितीत तुम्ही असाल. पर्स्पेक्टिव्हमध्ये बदल करण्याचा दिवस आहे. LUCKY SIGN - A black stone कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. स्वतःचं कोडकौतुक करून घेण्यासाठी दिवस चांगल्या वेलनेस अॅक्टिव्हिटीजमध्ये घालवण्याचा आहे. कोणाकडेही कर्जाची मागणी करू नये. जास्त प्रमाणात खात असाल, तर त्यावर नियंत्रण आणा. LUCKY SIGN - A red rose मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रतिसादाची वाट पाहत असाल, तर निराशा होण्याची शक्यता आहे. एखाद्या परिस्थितीत तुम्हाला नेमकं काय हवं आहे, याचा पुन्हा आढावा घेण्याची गरज आहे. एखाद्या अनपेक्षित फोनकॉलमुळे तुमचा दिवस उत्तम जाईल. LUCKY SIGN - Two ducks
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.