Home /News /lifestyle /

फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार

फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार

फळं आणि भाज्या एकत्र खाल्ल्यामुळे देखील पोट खराब होतं.

फळं आणि भाज्या एकत्र खाल्ल्यामुळे देखील पोट खराब होतं.

फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमीन आणि न्यूट्रिशन (Vitamin & Nutrition) असतात. योग्य पद्धतीने खाल्ले तरच शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

    दिल्ली, 28 जुलै : फळं कायला सगळ्यांनाच आवडतात. फळांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्स मिळतात. याशिवाय त्यामधील पाण्यामुळे शरीर हायट्रेट राहतं. फळांमध्ये मिनरल्स आणि फायबर असतात. त्यामुळे बद्धकोष्टतेची समस्या कमी होते. सिझनल फळं खाल्ल्यामुळे शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. फळांमुळे अन्नपचनालाही मदत होते. मात्र आपण जी फळं खातो त्यापासून आपल्याला पोषक घटक मिळणं अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने फळं खाणं किंवा चुकीच्या आहाराबरोबर फळं खाणं यामुळे फायद्या ऐवजी नुकसान होऊ शकतं. जाणून घेऊयात फळ खाण्याची योग्य पद्धत. (कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात) फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. साखरेमुळे पदार्थाचं विघटन होतं. त्यामुळेच फळांबरोबर इतर पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय फळांमध्ये इस्ट असतं. पोटात गेल्यानंतर त्याचं अ‍ॅसिड होतं. त्यामुळेच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे अ‍ॅसिडची मात्रा वाढते आणि पचनासंबंधीच्या समस्या व्हायला लागतात. (खगोलप्रेमींसाठी आज पर्वणी! दुहेरी उल्कावर्षाव पाहण्यासाठी राहा सज्ज) फळांमध्ये 80 ते 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज नसते मात्र फळ खाल्ल्यानंतर पाणी पिल्यामुळे आपल्याला उलटी किंवा मळमळ असा त्रास होऊ शकतो. (गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? Pregnancy टाळा) फळ खाल्ल्यानंतर पाणी पिल्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. पाणी पिण्यामुळे अन्न पचवणाऱ्या अ‍ॅसिडची निर्मिती संथ गतीने व्हायला लागते. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचत नाही आणि मग छाती मध्ये जळजळ सारखे त्रास होतात. (बोंबला! पुरावा म्हणून गर्लफ्रेंडला पाठवलेल्या PHOTO मुळे चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल) फळं खाण्याची योग्य पद्धत फळ खाल्ल्यानंतर 45 मिनिटं कोणताही पदार्थ खाऊ नका किंवा पिऊ नका. फळं पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. फळं योग्य प्रकारे खाल्ली तर त्यामधून पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. याशिवाय द्राक्ष, संत्र, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळं रिकाम्या पोटी खाऊ नयेत. (दिवसभरात बदलावे लागतात 100 डायपर्स, 9 बाळांच्या आईचा संघर्ष) दुपारच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी म्हणजेच संध्याकाळी किंवा सकाळी उठल्यानंतर फळं खावीत. जेवणानंतर फळं खाल्ल्यास त्याचा चुकीचा परिणाम शरीरावरती होतो. फळ चावून खवीत त्यातील फायबर्स पोट चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्याला लाभ मिळतात मात्र फळांचा रस प्यायला आवडत असेल तर, त्यामध्ये साखरेचा वापर करू नये.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या