Home /News /lifestyle /

दिवसभरात 100 डायपर्स बदलणं, सहा लीटर दूध पिणं; 9 बाळांना जन्म देणाऱ्या आईचा संघर्ष

दिवसभरात 100 डायपर्स बदलणं, सहा लीटर दूध पिणं; 9 बाळांना जन्म देणाऱ्या आईचा संघर्ष

मोरोक्कोमधल्या (Morocco) कॅसाब्लँका (Cassa Blanca) इथे ऐन बोजरा क्लिनिकमध्ये हलिमाची प्रसूती झाली होती. एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्याबद्दल हलिमाचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guiness Book of World Records) दाखल करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 28 जुलै: स्वतःची बाळं कुणाला आवडत नाहीत बरं? बाळांचं कोडकौतुक करणं, त्याला खेळवणं, न्हाऊमाखू घालणं या सगळ्या गोष्टी वेगळाच आनंद देणाऱ्या असतात; पण एखाद्या घरात एकाच वेळी नऊ नवजात बाळं असली तर? किती धांदल उडेल ना! एकाच बाळाचं सगळं करताना अक्षरशः नाकी नऊ येतात. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदापुढे त्याचं काही वाटत नाही. पण नऊ बाळं जन्माला आली तर त्यांचं सगळं सांभाळणं अत्यंत अवघड आहे आणि ही फक्त कल्पना नाही. मोरोक्कोमधल्या हलिमा सिसे (Halima Cisse) नावाच्या 24 वर्षांच्या युवतीने काही कालावधीपूर्वी एकाच वेळी नऊ बालकांना जन्म दिला होता. जगभरात ही बातमी चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा एकदा हलिमा चर्चेत आहे ती या बाळांना सांभाळण्याच्या संघर्षामुळे. होय, संघर्षच. कारण नऊ बाळांचं सगळं करण्यासाठी हलिमा आणि तिच्या पतीला 24 तास अक्षरशः शिफ्ट्समध्ये आणि शब्दशः रात्रीचा दिवस करून कार्यरत राहावं लागतं आहे. एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्याबद्दल हलिमाचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guiness Book of World Records) दाखल करण्यात आलं आहे. ती आनंदित झाली खरी; पण आता त्यांना सांभाळण्याचं शिवधनुष्य तिला पेलावं लागत आहे. सगळी बाळं मिळून दिवसभरात सहा लिटर दूध पितात. सगळ्यांचे मिळून दिवसभरात तब्बल 100 डायपर्स हलिमा आणि तिच्या पतीला बदलावे लागतात. खर्चाच्या दृष्टीने तर हे सारं अवघड आहेच; पण शारीरिक आणि मानसिक क्षमतेचाही कस पाहणारं आहे.

VIDEO : एका हातात मान धरली आणि सटासट मारत गेली; भररस्त्यात तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी

मोरोक्कोमधल्या (Morocco) कॅसाब्लँका (Cassa Blanca) इथे ऐन बोजरा क्लिनिकमध्ये हलिमाची प्रसूती झाली होती. सी-सेक्शनद्वारे (C-Section) या जगात प्रवेश केलेल्या या बाळांचं वजन पाण्याच्या एका बाटलीएवढंच होतं. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलं होतं. त्यांची चांगली काळजी घेतली गेल्यामुळे सगळी बाळं जगली. हलिमा सांगते, की बाळांच्या जन्मावेळी तिच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आपल्या पोटी नऊ बाळं जन्माला आली आहेत, हे तिला कळलं, तेव्हा ती आश्चर्यचकितच झाली. ऑपरेशन बेडवर असल्यापासूनच तिला ही चिंता सतावत होती, की एवढ्या बाळांची देखभाल करणार कशी? त्या वेळी डॉक्टर्सच्या मनात वेगळंच काही चाललं होतं. ही सगळी बाळं जगणार नाहीत, यापैकी काहीच बाळं वाचू शकतील, असं त्यांना वाटत होतं; मात्र सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे सगळ्या बाळांवर चांगले उपचार होऊ शकले आणि सगळी बाळं जगली.

काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा

ती बाळं जगली यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला; मात्र एवढ्या बाळांना जन्म दिल्यानंतर हलिमा स्वतः खूप अशक्त झाली आहे. एका बाळाचा जन्म झाला, तरी त्या अशक्तपणातून स्त्री बाहेर येण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. इथे तर नऊ बाळं जन्मली आहेत. बाळंतपणानंतर हलिमाची तब्येत अद्याप सुधारलेली नाही. त्यात नऊ बाळांना सांभाळण्याचं काम तिला आणखीच दमवतं आहे. सगळ्या बाळांची भूक, पुसणं, स्वच्छ करणं, रडणं या सगळ्याकडे लक्ष देणं हलिमाला अवघड जात आहे. दिवसाला 100 डायपर्स बदलणं आणि नऊ बाळांसाठी सतत दुधाच्या बाटल्या तयार करणं ही सोपी गोष्ट नाही. गेले तीन महिने हलिमा हे सगळं करत आहे. तिच्या पतीची साथ असली, तरी बाळाच्या आईवर पडणारा भार मोठा असतो. सरकारकडून त्यांना आर्थिक मदत मिळत आहे; पण शारीरिक कष्ट आणि थकव्याचं काय करणार? ते स्वतःच करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय नाही.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Pregnant woman, Viral news

पुढील बातम्या