Home /News /lifestyle /

बोंबला! पुरावा म्हणून गर्लफ्रेंडला पाठवलेल्या PHOTO मुळेच चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल झाली

बोंबला! पुरावा म्हणून गर्लफ्रेंडला पाठवलेल्या PHOTO मुळेच चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल झाली

एका नजरेतच बॉयफ्रेंडची चोरी पकडणाऱ्या या तरुणीच्या डिटेक्टिव्ह स्किलचं कौतुकही केलं जातं आहे.

    ब्रिटन, 28 जुलै : जोडीदारापासून (Couple) आपण दूर असताना त्याचं नेमकं चाललंय तरी काय याचाच विचार अनेकांच्या मनात असतो. तो किंवा ती कुणा दुसऱ्यासोबत रोमान्स किंवा मजा तर करत नसेल ना, असा किंचितसा का होईना मनात संशय येतोच. मग फोन, व्हिडीओ कॉल करून पडताळणी सुरू होते. काही जण तर स्वतःहूनच आपण किती सभ्य आहोत याचा पुरावा देण्यासाठी आपला व्हिडीओ किंवा फोटो आपल्या जोडीदाराला पाठवतात. पण त्यांनी दिलेला हाच पुरावा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, याचा विचारही कधी ते करत नाही. गर्लफ्रेंडला (Girlfriend) असाच पुरावा देणारा बॉयफ्रेंड (Boyfriend) चांगलाच फसला आहे (Couple cheating). एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला एक फोटो पाठवला आणि या फोटोत त्याच्या हुश्शार गर्लफ्रेंडने अखेर त्याची चोरी पकडलीच. तिने फोटो एका नजरेतच पाहून बॉयफ्रेंडची चिटींग ओळखली आहे.  मिररच्या रिपोर्टनुसार टिकटॉक युझर मेनग मॅरीने (TikTok User Megan Marie) आपल्या बॉयफ्रेंडने पाठवलेला फोटो शेअर केला आहे. हे वाचा - ज्याच्याशी ब्रेकअप केलं त्याने Tokyo Olympic मेडल जिंकलं; तरुणीला होतोय पश्चाताप आपण आपल्या मित्रांसोबत घरात ऑलिम्पिक पाहत असल्याचं त्याने सांगितलं. मेगनने हा फोटो झूम करून पाहिला तर बॉयफ्रेंडचा खरा चेहरा समोर आला. तिला समजलं की तिचा बॉयफ्रेंड खोटं बोलतो आहे. तो घरात मुलांसोबत नाही तर दुसऱ्याच मुलीसोबत होता हे तिच्या लक्षात आलं. आता तुम्ही हा फोटो पाहाल. तर म्हणाल यात तर तसं काहीच नाही की तिचा बॉयफ्रेंड तिला चीट करतोय असं दिसतं. मग या फोटोवरून तिने नेमकी चोरी पकडली कशी, असा प्रश्न पडतोच. हे वाचा - काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा मेगनने फोटो नीट पाहिला तेव्हा तिला टीव्हीच्या खाली असलेल्या काचेच्या कॅबिनेटवर एक रिफ्लेक्शन दिसलं. त्यात रेड वाइनच्या ग्लाससोबत एका तरुणीचा गुडघाही तिला दिसत होता आणि बॉयफ्रेंडची पोलखोल झाली. तरुणीच्या या डिटेक्टिव्ह स्किलचं कौतुकही केलं जातं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Relationship

    पुढील बातम्या