जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात

कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात

कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात

ग्रीन कॉफीमध्ये (Green Coffee) आरोग्याला हानिकारक असणारं कॅफीन नसतं. उलट त्यात बरेच पोषक घटक (Nutrients) आढळतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 28 जुलै : सकाळी आपला मूड फ्रेश (Fresh Mood) करणारी कोणती गोष्ट आपण आवडीने करतो? तर, ती म्हणजे कॉफी किंवा चहा (Tea Or Coffee) पितो. सकाळचा पहिला चहा किंवा कॉफी आपल्याला प्रिय असते. पण, तज्ज्ञ सांगतात यात कॅफीन (Caffeine) असतं. जे आपल्या आरोग्याला नुकसान**(Damage to Health)** पोहोचवतं. त्यामुळेच याचं अतिसेवन**(Overdose)** करून नये असा सल्ला डॉक्टर देखील देतात. ॲनिमियाचा**(Anemia)त्रास असणाऱ्या लोकांना कॉफीने प्रचंड नुकसान होतं. कॉफी मधील कॅफिन शरीरामध्ये आयर्नचं  शोषण कमी करतं आणि त्यामुळेच आणि ॲनिमियाच्या रुग्णांना जास्त त्रास होतो. याउलट ग्रीन कॉफी (Green Coffee) पिण्याने जास्त फायदा होतो. ग्रीन कॉफीमध्ये कॅफीन अजिबात नसतं. त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. ग्रीन कॉफी न भाजलेल्या कॉफी बियांपासून बनवली जाते. ज्यामध्ये ॲन्टीऑक्सीडंन्ट(Antioxidant)** असतं. संशोधनानुसार**(Research)**ग्रीन कॉफी घेतल्याने आपलं वजन कमी होतं. जाणून घेऊयात काय फायदे होतात. वजन कमी होतं सकाळी सकाळी चहा किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर, त्याऐवजी आता ग्रीन कॉफी प्यायला सुरुवात करा. यामुळे वजन कमी होऊ शकतं. अनेक संशोधकांच्या दाव्यानुसार ग्रीन कॉफी घेतल्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. ( करा तुमच्या Fitness Journey ला सुरुवात, या सवयी सोडलात तर राहाल तंदुरुस्त ) न्टीऑक्सीड****न्ट ग्रीन कॉफीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲन्टीऑक्सिडंट असतं. ज्यामुळे आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. शिवाय यामुळे एजिंग प्रोसेस स्लो झाल्यामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या कमी होतात. ( मूड चांगला राहण्यासाठी शाकाहारच बरा; पहा आयुर्वेद काय सांगतं ) डायबिटीस कंट्रोल मधुमेहाच्या रुग्णांनी ग्रीन कॉफी प्यायला सुरुवात केली तर, ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते असा संशोधकांचा दावा आहे. ग्रीन कॉफी पिण्याचा फायदा टाईप 2 डायबिटीसमध्ये होतो. ( मुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा! आता 4 आठवड्यांत 2 जिल्ह्यांमुळे पुन्हा कोरोना ‘ताप’ ) ब्लड प्रेशर कंट्रोल हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांसाठी कॉफी उपयोगी आहे. यामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतो. याशिवाय हार्ट एटॅक, क्रोनिक किडनी फेल्युअर सारखे त्रास होत नाहीत. ( ब्लड शुगर कंट्रोलसाठी रोज खा काळे चणे; या पद्धतीने खाल्यास जास्त फायदा ) एनर्जी वाढते कॉफी बियांमध्ये क्रोनॉलोजीकल ॲसिडअसतं. ज्यामुळे मेटाबॉलिजम चांगलं राहतं. मेटाबॉलिजम चांगलं राहिलं तर आपल्याला उत्साही वाटतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात