Dhanteras 2019: या गोष्टींशिवाय अपूर्ण आहे धनत्रयोदशीची पूजा, वाचा पूजेच्या सामानाची यादी

Dhanteras 2019: या गोष्टींशिवाय अपूर्ण आहे धनत्रयोदशीची पूजा, वाचा पूजेच्या सामानाची यादी

असं म्हटलं जातं की, या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पूजेच्यावेळी एखादी गोष्ट जरी कमी असेल तर ती पूजा अपूर्ण राहते.

  • Share this:

धनत्रयोदशीला पूजा आणि खरेदीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुबेर आणि धन्वंतरीची कृपा तुमच्यावर राहते असेही मानले जाते. या दिवशी विकत घेतलेल्या सामानाची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की, या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पूजेच्यावेळी एखादी गोष्ट जरी कमी असेल तर ती पूजा अपूर्ण राहते असं म्हटलं जातं. म्हणूनच आम्ही तुम्हाला पूजेची यादी देणार आहोत.

धनत्रयोदशी पूजेच्या सामग्रीची यादी-

सुपारी- धार्मिक प्रथेनुसार, पूजेच्यावेळी ब्रह्मदेव, यमदेव, वरुण देव आणि इंद्रदेव यांचं रूप म्हणून सुपारीकडे पाहिलं जातं. धनत्रयोदशीच्या पूजेनंतर सुपारी कपाटात ठेवणं शुभ मानलं जातं.

पान- पानाचा वापर अनेक धार्मिक कार्यात केला जातो. मान्यतेनुसार, देवी- देवता हे विड्याच्या पानात वास करत असतात. याचमुळे धनत्रयोदशीच्या पूजेत पानांचा वापर केला जातो.

धणे- असं म्हटलं जातं की, धनत्रयोदशीला लक्ष्मीला धणे वाहिले तर तिची कृपादृष्टी राहते आणि दाळिद्र्य दूर होतं.

लाह्या आणि बत्ताशे- या दोन्ही गोष्टी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यामुळे सर्व संकंटांतून सुटका होते.

कापूर- तुळशीच्या अर्कापासून कापूर तयार केला जातो. पूजेत याचा वापर फार शुभ मानला जातो. धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करताना कापूराचा वापर नक्की करा. असं केल्याने घरात सकारात्मकता नांदते आणि नकारात्मकता दूर होते.

दिवा- देवाला दिवा दाखवण्याला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ नक्की दिवा लावा. या दिवशी दिवा लावल्याने मृत्यूचा देवता यम आनंदी होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Viral Video: फुटबॉल खेळताना अचानक खेळाडूचा हिजाब निघाला आणि...

मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, धुराने होणार नाही इन्फेक्शन!

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 08:11 AM IST

ताज्या बातम्या