महिला फुटबॉल सामन्यात असं काही झालं की, ते पाहून तुमच्या चेहऱ्यावर आपसूक समाधान येईल. जॉर्डनमध्ये महिला खेळाडूंचा फुटबॉल सामना सुरू असताना अचानक एका फुटबॉलरचा हिजाब निघाला. यानंतर दुसऱ्या संघातील महिला खेळाडूंनी तिच्याभोवती घेराव घालत तिला सुरक्षित केलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, WAFF वूमन क्लब चॅम्पियनशिपमध्ये शबाब-अल-ऑर्डन क्लब आणि अरब ऑर्थोडोक्स क्लबमध्ये सामना रंगला होता. ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
JUST BEAUTIFUL.
— Shuaib Ahmed (@Footynions) October 13, 2019
Opponents huddle up around a Hijabi footballer in order to protect her from showing her hair. pic.twitter.com/O5aC84AhmN
रिपोर्टनुसार, WAFF वूमन क्लब चॅम्पियनशिपमध्ये जॉर्डन, फिलिस्तीन, बाहरेन, लेबनान आणि यूएई या देशांनी सहभाग घेतला होता. जॉर्डनच्या शबाब-अल-ऑर्डन या क्लबने ही स्पर्धा जिंकली. दरम्यान, सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष गेलं ते या सुंदर अशा व्हिडीओवर. यात लोक महिला फुटबॉल खेळाडूंचं भरभरून कौतुक करत आहेत. सामन्यादरम्यान फुटबॉलरचा हिजाब सैल झाल्यामुळे तिला स्वतःचे केस सोडावे लागल्यामुळे ती लगेच खाली बसते. हे पाहून विरोधी संघातील महिला खेळाडू तिच्याभोवती गोळा होतात आणि तिला हिसाब घालण्यात मदत करतात.
ट्विटरवर एका युझरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ अशा खासदारांना दाखवला पाहिजे जे हिसाब विरोधात आंदोलन करतात. जर्मनीतील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्यासाठी खासदार पळवाटा शोधत आहेत. पण तिथले विद्यार्थीच हिसाबचं समर्थन करत आहेत.’ या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच! Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर… Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी! या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना…

)







