Diwali 2019: दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, फटाक्यांच्या धुराने होणार नाही इन्फेक्शन!

Diwali 2019: दिवाळीत दम्याच्या रुग्णांसाठी या खास टिप्स, फटाक्यांच्या धुराने होणार नाही इन्फेक्शन!

दमा हा एक गंभीर आजार आहे. यामुळे श्वास घ्यायला व्यक्तीला त्रास होतो. दम्याच्यावेळी खोकला, नाक बंद होणं किंवा सतत वाहणं, छातीत दुखणं, रात्री आणि सकाळी श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.

  • Share this:

दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीला मित्र- परिवारासोबत मजा- मस्ती करण्याची अनेक स्वप्न तुम्ही रंगवली होती. एकीकडे सण- उत्सव हे आनंद घेऊन येतात तर दुसरीकडे फटाक्यांमुळे अनेक प्रकारचे आजार बळावण्याची शक्यताही जास्त असते.  फटाक्यांच्या धुराचा सर्वात जास्त फटका दमाच्या रुग्णांना होतो. दिवाळीनंतर दम्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना प्रत्येक वेळी पाहिलं गेलं आहे.

दमा हा एक गंभीर आजार आहे. यामुळे श्वास घ्यायला व्यक्तीला त्रास होतो. दम्याच्यावेळी खोकला, नाक बंद होणं किंवा सतत वाहणं, छातीत दुखणं, रात्री आणि सकाळी श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. पण अशात घाबरण्याऐवजी धैर्याने याला सामोरं जाण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे दम्याचे रुग्ण ही दिवाळी चांगल्याप्रकारे साजरी करू शकतील.

दम्याच्या रुग्णांसाठी काही खास टिप्स-

- दिवाळीच्या संध्याकाळी शक्यतो गरम कपडे घाला.

- असे कोणतेही पदार्थ खाऊ नका ज्याने शरीरातील गरमी कमी होईल.

- गरम पाणी किंवा गरम पदार्थ खाऊन शरीर सतत गरम राहील याची काळजी घ्या.

- दिवसा ऊन आल्यानंतर योग किंवा व्यायाम करा.

- फटाक्यांपासून शक्यतो दूर रहा. तसंच धुरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

- फटाक्यांमधील पाऊस आणि भूईचक्र यांच्यामध्ये सल्फर आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे विषारी रसायन असतात.

- इन्हेलर सतत स्वतःसोबत ठेवा.

- एसी किंवा पंख्याच्या अगदी खाली बसू नका.

- धुळीच्या जागी स्वतःला झाकून घ्या.

- घरात आणि बाहेरच्या वातावरणात होणाऱ्या बदलापासून सावध रहा.

- फार गरम किंवा अती थंड वातावरणात बसू नका. यामुळे मोल्ड स्पोर्स वाढण्याची शक्यता जास्त असते. तसेच तुमची औषधं सतत स्वतःसोबत ठेवा.

- स्वतःजवळ स्कार्फ नक्की ठेवा, ज्यामुळे हवेतून येणारे धुळीकणांपासून बचाव करू शकाल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट

या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी!

या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना..

Published by: Madhura Nerurkar
First published: October 22, 2019, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading