मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

मेहंदी लावण्यापूर्वी त्यात मिसळा या 4 गोष्टी, पांढरे होणार नाहीत केस!

केसांना रंग देण्यासाठी लोक मेहंदी, हेअर कलर किंवा डायचा वापर करतात. पण या सर्वाचा परिणाम फार कमी काळासाठी राहतो.

  • Share this:

गेल्या काही काळापासून केसांना रंग देणं हा एक ट्रेण्ड झाला आहे. काही लोक पांढरे केस लपवण्यासाठी केसांना रंग देतात तर काही फॅशन म्हणून केस रंगवतात. हायलाइट करणं हाही सध्याचा एक ट्रेण्ड आहे. त्यातही केसांना रंग देण्यासाठी लोक मेहंदी, हेअर कलर किंवा डायचा वापर करतात. पण या सर्वाचा परिणाम फार कमी काळासाठी राहतो. काही दिवसांनी किंवा महिन्यांनी रंग उतरायला लागतो. अशात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग दीर्घकाळ टिकून राहील.

मेहंदी भिजवण्यासाठी लागणारं पाणी तयार करण्याची विशेष पद्धत-

पाणी- 1 ग्लास

मेथी धणे पावडर- 1 चमचा

कॉफी पावडर- 1 चमचा

लवंग पावडर- 1 चमचा

प्रक्रिया-

एक ग्लास पाण्यात मेथी धणे आणि कॉफी पावडर टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी उकळा. यानंतर पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मेथीचे दाणे केसांना नैसर्गिकरित्या मजबूत आणि काळे करू शकता. तसेच कॉफी पावडर मेहंदीच्या रंगाला आधिक गडद करतात. तसेच लवंग पावडरमुळे केसांची मुळं घट्ट व्हायला मदत मिळते.

मेहंदी तया करण्याची पद्धत-

साहित्य-

मेहंदी- 100 ग्रॅम

हिबिस्कस पावडर (Hibiscus)- 1 टेबलस्पून

आवळा पावडर-  1 टेबलस्पून

शिकाकाई पावडर-  1 टेबलस्पून

कॉफी पावडर-  1 टेबलस्पून

प्रक्रिया-

लोखंडी कढईत मेहंदी हिबिस्कस पावडर, आवळा पावडर, शिकाकाई पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करा. यासाठी लोखंडी कढाईचाच वापर करणं गरजेचं आहे. यामुळे मेहंदी चांगल्या पद्धतीने ऑक्सीडाइज्ड होईल. आता यात तयार केलेलं पाणी घाला आणि रात्रभर किंवा सात ते आठ तास मेहंदी भिजवत ठेवा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट

या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी!

या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 22, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या