या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

या उपायांनी आता गळणार नाहीत तुमचे केस, एकदा वाचाच!

सामान्यतः दररोज ५० ते १०० केस कमी होऊ शकतात. परंतु गळलेल्या केसांची भरपाई करण्यास शरीर सक्षम नसेल तर त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो.

  • Share this:

मुलांचे असो किंवा मुलींचे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे राहणीमानातही बदल झाला आहे. याचा सर्वाधिक फटका केसांना आणि स्किनला बसतो. जसलोक हॉस्पिटलचे डिपार्टमेन्ट ऑफ डर्मटॉलॉजिस्टचे डायरेक्टर डॉ. आय.के. रामचंदानी यांनी केस गळती थांबवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत.

केस गळती ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. सामान्यतः दररोज ५० ते १०० केस कमी होऊ शकतात. परंतु गळलेल्या केसांची भरपाई करण्यास शरीर सक्षम नसेल तर त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो आणि केस पातळ दिसून येतात. केसांचे नुकसान होण्याची अनेक कारणं आहेत. लाइफस्टाइल आणि अनुवंशीकता ही मुख्य कारणं आहेत. तसेच औषधोपचारांमुळे होणारे साईड इफेक्ट यांमुळेही केस गळती होते. शारीरिक तसेच मानसिक ताण, नैराश्य, यांमुळेही मोठ्या प्रमाणात केस गळती होते. केस गळतीची लाखो कारणं असू शकतात. तुमचं कारण नेमकी कोणतं आहे यावर आधी तुम्ही नीट विचार करा. आम्ही आपल्याला काही सोप्या टीप्स देणार आहोत, जे आपल्याला निरोगी केस टिकवून ठेवण्यास मदत करतील.

पोषणः प्रथिने समृद्ध आहार घेण्याला प्राधान्य द्या. केस केरेटिन नामक प्रथिनांनी बनतात. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त प्रथिनं असतील याकडे लक्ष असू द्या. प्रथिनेयुक्त पोषक अन्न पदार्थ म्हणजे कोंब आलेले कडधान्य, अंडी, सोयाबीन आणि मांस.

व्हिटॅमिन ए: व्हिटॅमिन ए हे एक अँटिऑक्सीडेंट आहे. जे स्कॅल्पमधील सेबमचे निरोगी उत्पादन वाढवते. विटामिन एच्या कमतरतेमुळे स्कॅल्प कोरडी होते तसेच डँड्रफ होतो. यासाठी पुरेसे व्हिटॅमिन ए मिळविणे महत्वाचे आहे. व्हिटॅमिन एमध्ये गोड बटाटे, गाजर, भोपळा, पालक, कॉड माश्याच्या यकृताचे तेल आणि अंडी यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन ई: हे व्हिटॅमिन योग्य पद्धतीने रक्ताभिसरण करण्यास उत्तेजन देतं आणि यामुळे स्कॅल्पमध्ये डँड्रफ होत नाही.

बी जीवनसत्त्वे: बी जीवनसत्त्वे आपल्या शरीरात मेलेनिन तयार करण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांचा निरोगी रंग टिकून राहतो. पॅन्टोथेनिक असिड (बी ५ व्हिटॅमिन) देखील केसांच्या योग्य वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण अन्न, बदाम, मांस, मासे, सीफूड आणि हिरव्या भाज्यांसह बऱ्याच पदार्थांमधून बी- व्हिटॅमिन मिळतं.

व्हिटॅमिन सी: व्हिटॅमिन सी हे अँटिऑक्सीडेंट आहे जे फ्री रेडिकलमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करते. तसेच कोलेजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथिने तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे, जे केसांच्या संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरात लोह वाढविण्यासाठी मदत करते. सर्व लिंबूवर्गीय फळामधून व्हिटॅमिन सी मिळतं.

व्हिटॅमिन डी: व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियमचा स्तर टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि अॅलोपेस एरेट ऑटोमिम्यून सारखे अँटीबॉडीचा लोडदेखील कमी करतं.

आयन- आयनमुळे केस वाढायला मदत होते. केसांसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी आयन महत्त्वाचं आहे. लोहाची कमतरता, जी अशक्तपणाला कारणीभूत ठरते, केस गळण्यास हे एक मुख्य कारण आहे. हे विशेषतः महिलांमध्ये सामान्यपणे होते. आयनसाठी आहारात ऑयस्टर, अंडी, लाल मांस, पालक आणि दालचिनी यांचा समावेश करावा.

झिंक- झिंक केस वाढ आणि दुरुस्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. हे ऑइल ग्रंथींना योग्यरित्या कार्यरत असलेल्या फॉलिकल्सच्या आसपास ठेवण्यास देखील मदत करते. जास्तातील आहारामध्ये पालक, गहू यांचा समावेश करावा.

ओमेगा- ३ ओमेगा- ३ ने समृद्ध असलेले अन्न फॅटी फिश, अंड्याचे बलक, मासे अंडी (केव्हर) आणि दूध आहेत.

तणाव मुक्त आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करा- तणाव हे केसांच्या नुकसानाचे मूळ कारण आहे. तणावामुळे केस गळती होते. मग केस गळती होते याचा तणाव येतो यामुळे अधिक केसांचं नुकसान होतं. मेडिटेशन हा यावरील उत्तम पर्याय आहे. तसेच किमान दररोज ४५ मिनिटांचा व्यायाम आणि मेडिटेशन जरूर करावं. चांगल्या आरोग्यासाठी ६ ते ८ तासांची  झोप आवश्यक आहे.

आपले केस हळूवारपणे हाताळा-

आठवड्यातून २ ते ३ वेळा सौम्य शैम्पूने केस धुवा. ओल्या केसांवर कंगवा फिरवणे टाळा. आपले केस खूप गच्चं बांधू नका. आपली हेअर स्टाईल बदलत राहा. केसांना रंग, स्ट्रेटनिंग करणं किंवा आयनिंग करणं शक्यतो टाळा. यामुळे केस कमकुवत होतात.

धूम्रपान थांबवा- धूम्रपान केल्याने केसांना अधिक नुकसान होतं. यामुळे केस लवकर पिकतात. सिगारेटमधील विषारी टॉक्सिन केस खराब होण्यास व गळण्यास कारणीभूत आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बॉयफ्रेंडने खाऊ घातली पाणीपुरी, नंतर झाले असे काही की.... पाहा हा Viral Video

Diabetes Diet: हे नाश्ताचे प्रकार मधुमेहाच्या रुग्णांना आहेत वरदान

लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आजच खाणं सोडा या भाज्या!

दिवाळीत फक्त 5 हजार रुपयांमध्ये फिरा या भन्नाट ठिकाणी

कमी पैशांत दिवाळीची खरेदी करायची असेल तर या 4 वेबसाइटवर नक्की जा!

Published by: Madhura Nerurkar
First published: October 21, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading