सध्या भारतात डेंग्यूपासून अनेक रुग्ण आजारी पडत आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात या आजाराने डोकं वर काढलं आहे. प्रत्येक राज्य डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दरम्यान अमृतसरमध्ये मात्र एक वेगळीच घटना घडली आहे. या जिल्हयात डेंग्यूचे 11 रुग्ण आढळले. तरीही इथे शेळीच्या दुधाचा भाव एकदम वाढून 200 रुपये लिटर एवढा झाला. डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट अचानक कमी होतात. प्लेटलेट वाढवण्यासाठी शेळीचं दूध फायदेशीर असतं असा चुकीचा समज लोकांमध्ये आहे. नेमकी याच गोष्टीमुळे जिल्ह्यात एकाएकी शेळीच्या दुधाचे भाव वाढले. मात्र ट्रिब्यून इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वैद्यकीय तज्ज्ञांनी हे स्पष्ट केलं की, शेळीचं दूध प्यायल्यावर प्लेटलेटमध्ये वाढतात हे कुठेही सिद्ध झालेलं नाही. कवलजित सिंग यांच्या पत्नीला डेंग्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी शेळीचं दूध पिण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने 100 रुपयांना अर्धा लीटर दूध घेतलं. याशिवाय शहरात शेळी असणारा माणूस शोधणं हे सर्वात कठीण काम होतं. याशिवाय सान्सी समाजातील लोकांकडे मोठ्या प्रमाणात मेंढ्या आणि शेळी असतात. मेडिकल रिपोर्टनुसार, पौष्टिक आहाराने प्लेटलेट वाढतात. जिल्हा साथीचे रोग विशेषज्ञ डॉ. मदन मोहन यांनी ट्रिब्यून इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, या रोगासाठी लसीकरण नाही आणि विषाणूसाठी कोणतंही विशिष्ट प्रतिरोधक नाही. त्यामुळे डेंग्यूचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात द्रव्य प्यावं आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात मिळेल असा आहार ठेवावा. डॉ. मोहन पुढे म्हणाले की, इतर जागांपेक्षा यावर्षी अमृतसरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा कमी आहे ही एक सकारात्मक गोष्ट आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या मते (WHO), डासांमुळे होणारा आजार डेंग्यू हा शहरात अधिक जास्त प्रमाणात पसरला आहे. उष्ण कटिबंध हवामान, हवामानातील बदल, तापमान, सापेक्ष आर्द्रता अशा वातावरणात डेंग्यूचे मच्छर अधिक प्रमाणात आढळतात. ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार
अबब! एवढं महाग आहे हे परफ्यूम की दोनदा झाली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या
तुमचं तुमच्या नोकरीवर प्रेम आहे का? या मुद्यांकडे दुर्लक्ष करू नका
फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय
VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.