आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ आपण ऑफिसमध्ये घालवतो. दिवसातले जवळपास 10 ते 12 तास आपण ऑफिसमध्येच असतो. अशात आपण आपल्या योग्यतेनुसार योग्य ठिकाणी नोकरी करतोय की नाही याचा विचार करणंही गरजेचं आहे.
अनेकदा असंही होतं की, योग्य नोकरी मिळूनही आपण पाहिजे तेवढं योगदान देत नाही. अशात दिवसाच्या शेवटी तुम्हाला कामाचा आनंद मिळाला की नाही हे पाहणंही गरजेचं असतं. अशात काही मुद्द्यांचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं.
स्वतःला आव्हान द्या- अनेकदा आपण कन्फर्ट झोनमध्ये असतो त्यामुळे नवनवीन गोष्टी करण्यात उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळेच स्वतःला आव्हान द्या आणि सर्वात आधी कन्फर्ट झोनमधून बाहेर पडा. दिवसभरात एक तरी असं काम करा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल.
एक चांगल्या आणि सर्वोत्कृष्ट बॉसमध्ये फार मोठा फरक असतो. एक चांगला बॉस झालेल्या भांडणांकडे दुर्लक्ष करतो ते दुरूस्त करण्याच्या भानगडीत पडत नाही. तर सर्वोत्कृष्ट बॉस हा तुमच्या कामाचं कौतुक करून तुम्हाला पुढे जाण्याला प्रोत्साहन देतो.
तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथले सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करून तुम्हाला पाठिंबा देत असतील तर तुम्ही एका चांगल्या वातावरणात काम करत आहात असं समजावं.
कंपनीही चांगल्या प्रकारे प्रगती करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कंपनीला पुढे नेण्यासाठी तुम्ही 100 टक्के मेहनत करत आहात पण कंपनीची प्रगती होत नाही तर काय फायदा.
जर तुम्ही योग्य ठिकाणी काम करत असाल तर पैसा हा मुद्दा असता कामा नये. कारण योग्य नोकरीत शिकण्यासारखं खूप काही असतं यातूनच तुम्हाला भविष्यात पैसा मिळेल.
ज्या कंपनीत तुम्ही काम करत आहात तिथे स्वतःच्या परफॉर्मन्सकडे लक्ष द्या. स्वतःला अधिक चांगलं करण्याकडे लक्ष द्या. कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याची एक यादी तयार करा आणि त्यानुसार काम करा.
जर तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या बॉसची प्रगती होत असेल तरी तुम्ही योग्य नोकरीत आहात हे लक्ष असू द्या. कारण तुम्हाला सर्व गोष्टी येत आहेत आणि याचं कौतुक कधी ना कधी होईल हे विसरू नका.
जर तुम्ही तुमचं काम दिलेल्या वेळात पूर्ण करत असाल तर तुम्ही तुमच्या टीमसाठी एक चांगलं उदाहरण आहात हे लक्षात ठेवात.
नोकरीला वेळ देणं आणि कुटूंबाला वेळ देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही ऑफिससोबत कुटूंबालाही तेवढाच वेळ दिला तर तुम्ही योग्य ठिकाणी काम करत आहात हे लक्षात असू द्या.