Elec-widget

अबब! एवढं महाग आहे हे परफ्यूम की दोनदा झाली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या खासियत

अबब! एवढं महाग आहे हे परफ्यूम की दोनदा झाली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या खासियत

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे हा परफ्यूम स्प्रे करायला रिमोट कंट्रोलची गरज लागते. ही बाटली तयार करायला तीन वर्ष लागली. या दरम्यान 494 वेळा या बाटलीचं परीक्षण करण्यात आलं.

  • Share this:

संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई येथील एका कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी जगातील सर्वात महागडं परफ्यूम तयार केलं आहे. या परफ्युमचं नाव आहे शुमुख, अरबी भाषेत या शब्दाचाअर्थ असतो की सर्वात योग्य. असगर अदम अली या व्यक्तीने हे परफ्युम तयार केलं असून ते नबील परफ्यूम ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि मास्टर परफ्यूमर आहेत. विशेष म्हणजे या परफ्यूमची किंमत आहे तब्बल 9 कोटी रुपये.

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे हा परफ्यूम स्प्रे करायला रिमोट कंट्रोलची गरज लागते. हा परफ्यूम त्वचेवर लावल्यानंतर सुमारे 12 तास याचा सुगंध शरीरावर टिकून राहतो. तर कपड्यांवर 30 दिवस याचा सुगंध टिकून राहतो. याची बाटली 1.97 मीटल लांब आहे आणि ही बाटली तयार करायला तीन वर्ष लागली. या दरम्यान 494 वेळा या बाटलीचं परीक्षण करण्यात आलं.

या बाटलीला सोन्याचा गरुड, अरबी घोडे, गुलाब आणि एका ग्लोबने सजवण्यात आले आहे. यात 38.55 कॅरेटचे 3 हजार 571 हिरे, 18 कॅरेट सोन्याचे 2.5 किलोचे स्वर्ण मोती आणि 5.9 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. यामुळेच या परफ्यूमच्या नावावर एक नाही तर दोन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

परफ्यूमच्या बाटलीवर सर्वात जास्त हिरे जडवण्याचा रेकॉर्ड आहे तर दुसरा सर्वात मोठा रिमोट कंट्रोल फ्रेगरेन्स स्प्रे प्रोडक्टचा रेकॉर्ड या परफ्यूमच्या नावावर आहे. शुमुख परफ्यूम 30 मार्चला लॉन्च करण्यात आलं.

Loading...

दूध पिण्याआधी आणि नंतर चुकूनही करू नका या चूका, होतील घातक परिणाम

ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार

आयोडिनच्या मदतीने थायरॉइड राहील नियंत्रणात, जाणून घ्या फायदे

या सोप्या टिप्सने तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...