ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार

ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार

तुम्ही कधी असा डॉक्टर पाहिला आहे का जो शरीराला आग लावून उपचार करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच अनोख्या थेरपीबद्दल सांगणार आहोत.

  • Share this:

औषधं किंवा पारंपारिक उपायांनी आपण आजही अनेक आजारांवर उपचार घेत असतो. डॉक्टर त्यांच्या पद्धतीने औषधं देऊन रुग्णांना बरं करतात. पण तुम्ही कधी असा डॉक्टर पाहिला आहे का जो शरीराला आग लावून उपचार करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच अनोख्या थेरपीबद्दल सांगणार आहोत. यात शरीराला आग लावून रुग्णांवर उपचार केले जातात. ही थेरपी भारतात जरी करत नसले तरी चीनमध्ये केली जाते. विशेष म्हणजे 100 वर्षांहून अधिक काळ ही थेरपी चीनमध्ये वापरली जात आहे.

या थेरपीला फायर थेरपी असं म्हणतात. चीनमध्ये अनेक आजारांवर याच थेरपीच्या मदतीने उपचार केले जातात. या थेरपीने रुग्णांवर उपचार करणारे 'झांग फेंगाओ' हे फार प्रसिद्ध आहेत. या थेरपीने अनेक आजारांवर उपचार करता येतात. यात तणाव, औदासिन्य, अपचन आणि वंध्यत्वपासून ते कर्करोगापर्यंतचे उपचार या फायर थेरपीने शक्य आहेत. म्हणजे जर तुम्ही या थेरपीचा वापर केला तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहेत.

झांग फेंगाओबद्दल सांगायचे झाले तर ते बीजिंगमधील एका छोट्या अपार्टमेन्टमध्ये या अनोख्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात. एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला रुग्णाच्या पाठीवर औषधी वनस्पतींपासून एक लेप तयार केला जातो. मग तो लेप एका टॉवेलने झाकला जातो. त्यावर पाणी आणि अल्कोहोल शिंपडलं जातं आणि रुग्णाच्या शरीरावर आग लावली जाते. फेंगाओ आजारांवर अशाच पद्धतीने उपचार करतात.

त्यांचा ही उपचार करण्याची पद्धत चीनच्या प्राचीन गोष्टींवर आधारित आहे. यात शरीरातील गरमी आणि थंडी यांच्यात मेळ बसवण्यावर भर दिला जातो. झांग फेंगाओंच्या मते, शरीराचा वरील भाग गरम करून शरीरातील आतील थंडी दूर केली जाते. यात अनेकांना इजाही होते. अनेकदा रुग्णांच्या शरीराचा काही भाग किंवा चेहरा थोडासा जळतोही. पण या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने न केल्यामुळेच होतात. मी हजारो लोकांना फायर थेरपी शिकवली. पण कधीही अशा घटना घडल्या नाहीत.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Loading...

दूध पिण्याआधी आणि नंतर चुकूनही करू नका या चूका, होतील घातक परिणाम

आयोडिनच्या मदतीने थायरॉइड राहील नियंत्रणात, जाणून घ्या फायदे

या सोप्या टिप्सने तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता

आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर बुद्धाचे हे विचार एकदा वाचाच!

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...