फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय

फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय

धार्मिक कार्यांशिवायही याचा उपयोग यकृताचा आजार, लैंगिक आजार, बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांमधून आराम मिळण्यासाठी होतो.

  • Share this:

दुर्वांचं धार्मिक महत्त्व तर साऱ्यांनाच माहीत आहे. गणपतीची पूजा आजही दुर्वांशिवाय अपूर्ण आहे. पण फक्त धार्मिकच नाही तर दुर्वांचे अनेक औषधी गुणही आहेत ज्यामुळे आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. फार कमी लोकांना माहीत आहे की, धार्मिक कार्यांशिवायही दुर्वांचा उपयोग यकृताचा आजार, लैंगिक आजार, बद्धकोष्ठता अशा अनेक आजारांमधून आराम मिळण्यासाठी होतो. आज आपण दुर्वांचे फायदे जाणून घेणार आहोत.

- आयुर्वेदानुसार दुर्वांची चव ही तुरट असते. पण यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, पोटॅशियम यांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. दुर्वा खाल्ल्याने तोंडाचा अल्सरचं दूर होतो असं नाही तर पित्त आणि बद्दकोष्ठता यांसारखे आजारही दूर होतात.

- दूर्वा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सहजपणे कुठेही उपलब्ध असलेल्या दूर्वाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात ही फार उपयोगी आहे. याशिवाय ज्यांना अनिद्रेचा त्रास असेल, तसेच तणाव आणि सतत थकवा जाणवत असेल तर त्यांना दुर्वांच्या सेवनाने आराम मिळेल.

- दुर्वा आणि हळदीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावल्यास, मुरमं, काळे डाग यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचा सतेज होते.

- कडूलिंबाची पानं आणि दुर्वा यांचा प्रत्येक एक चमचा रस एकत्र करून दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय दुर्वा या डोळ्यांसाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. दररोज सकाळी अनवाणी गवतावर चाललात तर त्याचा डोळ्यांना फायदा होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर बुद्धाचे हे विचार एकदा वाचाच!

दूध पिण्याआधी आणि नंतर चुकूनही करू नका या चूका, होतील घातक परिणाम

ऐकावं ते नवलंच! आजार दूर करण्यासाठी शरीराला लावली जाते आग, असा होतो उपचार

अबब! एवढं महाग आहे हे परफ्यूम की दोनदा झाली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या

VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

Published by: Madhura Nerurkar
First published: September 19, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading