मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता हद्दच झाली! कोरोनाचा उद्रेक होत असताना कपलचा 'कार'नामा! तब्बल 30 हजारांचा फटका

आता हद्दच झाली! कोरोनाचा उद्रेक होत असताना कपलचा 'कार'नामा! तब्बल 30 हजारांचा फटका

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या गोष्टींना महत्व देतात.

कडक निर्बंध असताना बहुतेक कपल असा प्रताप करताना दिसत आहेत.

ब्रिटन, 06 मार्च : सध्या कोविड-19 च्या साथीमुळे (Covid-19 Pandemic) प्रवास करणं, जास्त लोकांनी एकत्र येणं, रात्री उशिरा रस्त्यावर फिरणं अशा अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. या सगळ्या निर्बंधांमुळे प्रेमीयुगुलांची मात्र कोंडी होत आहे. त्यांना मनमोकळेपणे भेटता येत नाही की एकत्र वेळ घालवता येत नाही. त्यामुळे अनेक कपल  कारचा आसरा घेत असल्याचं दिसून येत आहे. पाश्चिमात्य देशात तर वारंवार अशा घटना घडत असून, पोलिसांनी अशा अनेक जोडप्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. ब्रिटनमधील डर्बी इथंही पोलिसांनी एका जोडप्याला आपल्या कारमध्ये सेक्स (SEX) करताना पकडलं आणि त्यांच्यावर लॉकडाऊनचा नियम मोडल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली. या जोडप्याला यासाठी 400 डॉलर्स म्हणजे तब्बल 30 हजार रुपयांचा  दंड भरावा लागला. डर्बिशायर पोलिसांना मोर्ले भागात रात्री उशीरा गस्त घालत असताना एक कार आढळली. जवळ जाऊन बघितलं असता त्यांना कारमध्ये एक जोडपं सेक्स करताना आढळलं. पोलिसांनी आपल्याला अशा आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्याचं लक्षात आल्यावर जोडप्याला अतिशय ओशाळवाणं वाटलं. पोलिसांनी त्यांना लॉकडाऊनचा नियम मोडल्याबद्दल नोटीस बजावली आणि प्रत्येकी 400 डॉलर्सचा दंड ठोठावला. पुन्हा नियम न मोडण्याची तंबीही पोलिसांनी दिली. हे वाचा - गात गातच घेतली कोरोना लस; गायिकेच्या लसीकरणाचा VIDEO VIRAL एरवॉश रिस्पॉन्स युनिटच्या ट्विटर (Twitter) पेजवर या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ‘रात्री उशीरा मोर्ले भागात एक ‘रम्पी-पम्पी’ कार आढळली. त्यातील जोडप्याला नियमभंगाबद्दल दंड करून, ताकीद देण्यात आली’ असं म्हणून त्या कारचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. यावर युजर्सनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून, एकानं किती लाजिरवाणे, असं म्हटलं आहे, तर एकानं पोलिसांच्या कारच्या क्रमांकाकडं लक्ष वेधलं आहे. हे वाचा -  राजघराण्यापासून वेगळं झालेल्या प्रिन्स हॅरीने वर्षभरानंतर केलं मोठं वक्तव्य गेल्या महिन्यात दक्षिण डर्बीशायर पोलिसांनीही (South Derbyshire Police) कारमध्ये सेक्स करणाऱ्या एका जोडप्याला दंड केला होता. त्या जोडप्यातील तरुण मुलगा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी 100 मैल ड्राईव्ह करून आला होता. भेटल्यानंतर त्यांना स्वतःला आवरणं कठीण झालं आणि त्यांनी कारमध्ये सेक्स करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलीस तिथं आल्यानं या जोडप्याला मोठा दंड भरून सुटका करून घ्यावी लागली. विलिंगटन इथंही एका जोडप्याला पोलीसांनी कारमध्ये सेक्स करताना पकडलं होतं.
First published:

Tags: Britain, Covid19, Cute couple, International, Lockdown, Police, Sex, Social distancing, Uk

पुढील बातम्या