राजघराण्यापासून वेगळं झालेल्या प्रिन्स हॅरीने वर्षभरानंतर केलं मोठं वक्तव्य

प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी मार्च 2020 मध्ये ब्रिटनच्या राजघराण्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी मार्च 2020 मध्ये ब्रिटनच्या राजघराण्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:
ब्रिटन, 04 मार्च: प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि त्याची पत्नी मेगन मार्केल (Meghan) यांनी ब्रिटनचं राजघराणं सोडलं असून सध्या ते अमेरिकेत राहत आहेत. ब्रिटनचं राजघराणं सोडलेल्या प्रिन्स हॅरी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'शाही जीवनशैलीपासून स्वत:ला वेगळं करण्याची प्रक्रिया माझ्यासाठी आणि पत्नी मेगनसाठी खूपच कठीण होती.' हॅरीने ओप्रा विनफ्रेला मुलाखत दिली. या मुलाखती वेळी त्याने आपली दिवंगत आई राजकुमारी डायना (Princes Diana) यांची आठवण काढली. राजकुमारी डायना यांनी प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांच्याशी घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रिन्स हॅरीनं पुढं सांगितलं की, 'मी माझ्या पत्नीसोबत बसून तुमच्याशी इथं बोलू शकत आहे ही माझ्यासाठी खूपच दिलासादायक आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण मी याची कल्पना सुद्धा करु शकत नाही की त्यांच्यासाठी (राजकुमारी डायना) त्या वर्षांमध्ये अशा प्रक्रियेतून एकटं जाणं किती अवघड झालं असावं.' प्रिन्स हॅरीनं असं सुद्धा सांगितलं की, 'राजघराण्यापासून वेगळं होणं आमच्या दोघांसाठी इतकं कठीण होतं की याची कल्पना सुद्धा करता येणार नाही, पण कमीत कमी आम्ही एकमेकांसोबत आहोत.' प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांची ही मुलाखत सीबीएसवर 7 मार्च आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटनमध्ये प्रसारित केली जाणार आहे. मुलाखतीमध्ये हॅरी जेव्हा राजकुमारी डायनाबाबत सांगत आहे तेव्हा त्याचे आई डायनासोबतचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या फोटोमध्ये डायना यांनी चिमुकल्या हॅरीला पकडलेले दिसत आहे. 1997 मध्ये राजकुमारी डायना यांचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. वाचा -  'माझ्यासोबत चंद्रावर चला', जपानी अब्जाधीशानं दिलं मोफत प्रवासाचं निमंत्रण! प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी मार्च 2020 मध्ये ब्रिटनच्या राजघराण्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. बकिंघम पॅलेसनं शुक्रवारी सांगितलं होतं की, 'हॅरी आणि मेगन ब्रिटनच्या राजघराण्यातील कार्यकारी सदस्य म्हणून परत येणार नाहीत.' प्रिन्स हॅरीची आजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं होतं की, 'राजकुमार आणि राजकुमारीनं महाराणीला आपल्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. दोघांनी राजघराण्याशी संबंध तोडण्याची घोषणा केल्याला आता एक वर्ष पूर्ण होईल. या निर्णयाबाबत महाराणीने त्यांना पत्र लिहित सांगितलं होतं की, 'ते राजघराण्यात परत आले नाही तर त्यांच्या सर्व सन्मानित सैन्य नियुक्या आणि राजेशाही पदे राजघराण्यातील इतर कार्यरत सदस्यांमध्ये वाटली जातील.'
First published: