मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गात गातच घेतली कोरोना लस; गायिकेच्या लसीकरणाचा VIDEO VIRAL

गात गातच घेतली कोरोना लस; गायिकेच्या लसीकरणाचा VIDEO VIRAL

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनने (Dolly Parton) अनोख्या अंदाजात कोरोना लस (corona vaccine) घेतली आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनने (Dolly Parton) अनोख्या अंदाजात कोरोना लस (corona vaccine) घेतली आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनने (Dolly Parton) अनोख्या अंदाजात कोरोना लस (corona vaccine) घेतली आहे.

टेनेसी, 05 मार्च :  सध्या सगळ्या जगाचं लक्ष कोरोना लसीकरणावर (Corona Vaccination) केंद्रीत झालं आहे. अनेक देशांमध्ये वेगानं कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून, लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. तिथंही सध्या ज्येष्ठ नागरिक आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. प्रत्येकजण आपआपल्या परीनं लसीकरणाचं स्वागत, समर्थन करत आहे. अमेरिकेतील 75 वर्षीय  प्रसिद्ध गायिका डॉली पार्टनने (Dolly Parton) अनोख्या अंदाजात लस घेतली आहे. डॉली पार्टनने टेनेसी इथल्या व्हँडेरबिल्ट हेल्थ सेंटर (Vanderbilt Health Centre) इथं मंगळवारी मॉडर्नाची कोरोना प्रतिबंधक लस (Moderna Corona Vaccine) घेतली. लस घेण्यापूर्वी ती गाऊ लागली.  आपल्याच एका प्रसिद्ध गाण्याचे कोविड व्हर्जन तिनं निर्माण केलं असून, एका व्हिडिओद्वारे लशीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा चार मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ‘डॉलीला स्वतःच्या औषधाचा एक डोस मिळतो.’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. मॉडर्ना लसीच्या संशोधनासाठी डॉली पार्टननं अर्थसहाय्यदेखील केलं असल्यानं ही कॅप्शन देण्यात आली असावी. डॉली पार्टनने कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी मॉडर्नाऔषध कंपनीबरोबर संशोधन करणाऱ्या व्हँडेरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरला (Vanderbilt University Medical Centre) दहा लाख अमेरिकी डॉलर्सची देणगीही दिली आहे. हे वाचा - सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस? मोदी सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता या व्हिडिओच्या सुरुवातीला डॉली पार्टन उत्साहानं अखेर आपल्याला लस मिळण्याचा दिवस उजाडला असं म्हटलं आहे. तिनं आपल्या अतिशय लोकप्रिय ‘जोलीन’(Jolene) गाण्याचं कोविड व्हर्जन (Covid Version) गुणगुणतच लस घेतली. ‘Vaccine,Vaccine,Vaccine, Vaccine, I’m begging of you please don’t hesitate. Vaccine, vaccine, vaccine, vaccine, because once you’re dead, then that’s a bit too late.” असं गुणगुणत तिनं  आपल्या चाहत्यांनाही तिनं लस घेण्याचं आवाहन केलं आहे. हे वाचा - कोरोना महामारी कधी संपणार? शास्त्रज्ञांनी सांगितलं विचारात पाडणारं भयंकर सत्य या व्हिडिओत ती पुढे म्हणते ,हे हास्यास्पद वाटत असेल. पण लशीबाबत मी अतिशय गंभीर आहे. आपण सर्वांनी पुन्हा पूर्वीच्या सामान्य स्थितीत परत यावं, असं मला वाटतं. यासाठी गरज आहे ती सर्वांनी लस टोचून घेण्याची. स्वतःची अवस्था चिकनच्या तुकड्या सारखी होऊ देऊ नका. घराबाहेर पडा आणि लवकरात लवकर लस घ्या'
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या