Home /News /lifestyle /

'ब्रेकअप के बाद' धक्क्यातून सावरणारं Breakup Funeral Rituals; काय आहे हे आणि कसं करायचं पाहा

'ब्रेकअप के बाद' धक्क्यातून सावरणारं Breakup Funeral Rituals; काय आहे हे आणि कसं करायचं पाहा

ब्रेकअपनंतर जोडीदाराशिवाय राहणे आणि ब्रेकअपचे दु:ख शेअर करणे यालाच 'ब्रेकअप फ्युनरल रिचुअल' असे म्हणतात. असे केल्याने चिंता, तणाव आणि ब्रेकअपचे नकारात्मक परिणाम दूर होण्यास मदत होते आणि तुम्हाला सामान्य जीवनात लवकर परत येऊ शकता.

  Breakup Funeral Rituals : आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते जेव्हा तुम्ही तुमच्या कोणालातरी खूप आवडू लागता आणि हळूहळू ही आवड प्रेमात बदलू लागते. हे प्रेम फुलत जातं आणि तुम्ही त्या नात्यात (Relationship) गुंतून जाता. या स्थितीत क्षणभरही एकमेकांशिवाय जगणं कठीण होतं आणि दोघेही संपूर्ण आयुष्य (Love Life) एकत्र घालवण्याचे स्वप्न पाहू लागतात. मात्र परिस्थिती प्रत्येकाची सारखी नसते. जीवनात अनेक बदल होतात आणि अनेक वेळा हे बदल दोघांनी एकमेकांना एकत्र राहण्यासाठी दिलेल्या आश्वासनांच्या (Relationship Promises) पलीकडे जातात. त्यानंतर नातं ब्रेकअपवर संपते. नात्यातील हा सर्वात वेदनादायक टप्पा असतो. आपल्यापैकी बरेच जण ब्रेकअपच्या (Breakup) परिस्थितीतून गेले असतील किंवा जात असतील. नातं तुटण्याचं किंवा ब्रेकअपचं दु:ख (Pain Of Breakup) खूप मोठं असतं. त्यामुळे अनेकांमध्ये अस्वस्थता आणि निराशा वाढत जाते, तर काही वेळा तुम्हाला हळूहळू मानसिक आजारी असल्यासारखे भासू लागते. का केले जातात ब्रेकअप अंत्यविधी? ( Breakup Funeral Rituals) कोणाचा मृत्यू झाला की घरी अंत्यसंस्कार म्हणून अनेक प्रकारचे अंत्यविधी केले जातात. अशा दु:खाच्या काळात घरातील, कुटुंबातील आणि समाजातील सर्व लोक तुमच्या पाठीशी उभे असतात, दहा दिवस सर्व गतिविधींमध्ये मृत्यूच्या वेदना आणि दु:ख शेअर करण्याचा प्रयत्न करातात. या दहा दिवसात गेलेल्या व्यक्तीशिवाय जगण्याचं धैर्य कुटूंबाला मिळते आणि हळूहळू कुटुंबातील सदस्यांना त्याच्याशिवाय जगण्याचा मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे, ब्रेकअपनंतर जोडीदाराशिवाय राहण्यासाठी आणि ब्रेकअपच्या वेदना शेअर करण्यासाठी काही विधी (Rituals For Breakup) करणे आवश्यक असते. त्याचा ब्रेकअप अंत्यविधी ( Breakup Funeral) म्हणतात. असे केल्याने चिंता, तणाव आणि ब्रेकअपचे नकारात्मक परिणाम दूर होण्यास मदत होते. तसेच तुम्ही सामान्य जीवनात लवकर परत येऊ शकता.

  कसे करावे ब्रेकअप अंत्यविधी?

  शोक काळ घट्ट झालेल्या नात्यातून सहज बाहेर पडणं सोपं नसतं. त्यामळेच स्वत:ची परिस्थती स्वीकारून त्या नात्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. या दरम्यान तुमचे दु:ख लपवून ठेवण्याऐवजी तुम्ही एकट्यात अश्रून वाट मोकळी करुन द्यावी किंवा मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तिशी शेअर कराव्या. या काळात तुम्हाला मानसिक आराम देणारी प्रत्येक गोष्ट करा.

  Eye Care: चश्मा की कॉन्टॅक्ट लेन्सेस? तुमच्या डोळ्यांसाठी काय अधिक चांगलं?

  सावरण्यासाठी वेळ निश्चत करा दुःखातून सावरण्यासाठी किंवा परिस्थिती स्वीकारण्यास वेळ लागू शकतो. परंतु हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आपण जितक्या लवकर वास्तव स्वीकारू तितकेच ते आपल्यासाठी चांगले असेल. त्यामुळे या सगळ्यातून सावरण्यासाठी एक वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ एक महिना किंवा 10 दिवस इत्यादी. या काळात असे काम करा ज्यामुळे तुम्हाला मानसिक आराम मिळण्यास मदत होईल. हेअर कट बदला कधी-कधी स्वतःच्या लूकमध्ये बदल केल्याने देखील भूतकाळातून बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या केसांना नवा लुक द्या आणि आपल्या आवडीनुसार केस कापून घ्या. विश्वास ठेवा, तुम्हाला फ्रेश आणि चांगलं वाटेल.

  International Yoga Day : इटलीच्या रस्त्यावर योगा दिनाचा उत्साह; नउवारीत केली योगासनं पाहा Photo

  पार्टी द्या ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही मित्रांसोबत पार्टी करू शकता. ही पार्टी तुमची अचिवमेंट, तुमचा आनंद आणि मित्रांच्या नावे करा. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळेल. घराला नवीन लुक द्या ब्रेकअपनंतर आपलं घर रिअरेंज करा किंवा घराचा लुक बदला. कधी कधी काही आठवणी घरातील वस्तूंसोबत जोडलेल्या असतात. अशा वस्तू घरातून काढून टाका किंवा कुणाला तरी द्या. असे केल्याने तुम्ही ब्रेकअपच्या दु:खावर मात करू शकाल आणि सामान्य जीवनात लवकर परत येऊ शकाल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Breakup, Couple, Lifestyle, Mental health, Relationship, Relationship tips

  पुढील बातम्या