Home /News /lifestyle /

Eye Care: चश्मा की कॉन्टॅक्ट लेन्सेस? तुमच्या डोळ्यांसाठी काय अधिक चांगलं?

Eye Care: चश्मा की कॉन्टॅक्ट लेन्सेस? तुमच्या डोळ्यांसाठी काय अधिक चांगलं?

Eye Q ने दिलेल्या माहितीनुसार चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सचे काही फायदे तर काही तोटेदेखील आहेत. या दोन्हींपैकी नेमके (Spectacles Or Contact Lenses) काय चांगले आहे किंवा कशाची निवड करावी असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर आम्ही तुमच्यासाठी हे काम थोडे सोपे केले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 20 जून : दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याची निवड वैयक्तिक पसंतींवर अवलंबून असते. लोक आपली जीवनशैली, आराम, सुविधा आणि अगदी बजेटचा विचार करून चष्मा घ्यावा की कॉन्टॅक्ट लेन्स हे निवडतात. या दोन्हींचेही दृष्टी आणि डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही फायदे आणि तोटे आहेत. आता या दोन्हींपैकी नेमके काय चांगले आहे. किंवा कशाची निवड करावी असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर आम्ही तुमच्यासाठी हे काम थोडे सोपे केले आहे. Eye Q द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, चष्मा आणि लेन्सचे फायदे-तोटे खालीलप्रमाणे आहेत. चष्म्याचे फायदे (Advantages Of Spectacles) - चष्मा घातल्याने डोळ्यांना स्पर्श करण्याची फारशी गरज पडत नाही. ज्यामुळे डोळ्यांना जळजळ होण्याची किंवा डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. - एखाद्या व्यक्तीचे डोळे कोरडे किंवा संवेदनशील असल्यास चष्मा त्याच्या समस्या वाढवत नाही. - कॉन्टॅक्ट लेन्सच्या तुलनेत चष्मा बजेट फ्रेंडली असतो. - सध्या चष्म्याच्या फ्रेम्स फॅशनेबल मिळतात आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला चांगली भर पडते. - चष्मा वारा, धूळ आणि इतर आवश्यक घटक डोळ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. - जर तुम्हाला स्क्रीनवर जास्त तास काम करावे लागत असेल. तर चष्मा अल्ट्राव्हायोलेट गार्डसह येतो जो लॅपटॉप आणि स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून रेटिनाचे संरक्षण करतो.

  Diabetes: डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

  चष्म्याचे तोटे (Disadvantages Of Spectacles) - चष्मा डोळ्यांपासून सुमारे 12 मिमी म्हणजे सुमारे अर्धा इंच अंतरावर असतो. त्यामुळे तुमची परिधीय दृष्टी विकृत होऊ शकते. - चष्म्यामुळे लोकांना वस्तूंवर लक्ष केंद्रित करताना अडचण येते आणि जेव्हा ते पहिल्यांदा चष्मा घालू लागतात तेव्हा अंधुक दृष्टी देखील येते. - चष्मा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व वाढवतो. परंतु चष्मा घातल्यानंतर ते कसे दिसतात हे बर्‍याच लोकांना आवडत नाही. त्यांना असे वाटते की चष्मा त्यांच्या चेहर्याचे सौंदर्य कमी करते. काही प्रकरणांमध्ये, चष्म्यामुळे डोळे अनैसर्गिकपणे लहान किंवा मोठेदेखील दिसू शकतात. कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचे फायदे (Advantages Of Contact Lances) - कॉन्टॅक्ट लेन्समुळे आपण सभोवतालचे संपूर्ण दृश्य व्यवस्थित पाहू शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स चष्म्यांपेक्षा कमी दृष्टी विकृती आणि अडथळे निर्माण करतात. - कॉन्टॅक्ट लेन्स घालून तुम्ही कोणतेही खेळ खेळू शकता. व्यायाम करू शकता किंवा नृत्य देखील करू शकता. - कॉन्टॅक्ट लेन्सवर सामान्यत: हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम होत नाही. - लोक वेगवेगळ्या रंगांच्या लेन्ससह प्रयोग करू शकतात.

  घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर!

  कॉन्टॅक्ट लेन्सचे तोटे (Disadvantages Of Contact Lances) - कॉन्टॅक्ट लेन्स लावण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी लोक संघर्ष करतात. मात्र योग्य तंत्र आणि सरावाने त्याचा वापर सुलभ होऊ शकतो. - कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यापर्यंत येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि डोळे कोरडे होण्याची तीव्रता आणखी वाढू शकते. - कॉन्टॅक्ट लेन्स घातल्याने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची लक्षणे वाढतात. - डोळ्यांचे संभाव्य गंभीर संक्रमण टाळण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची योग्य काळजी, तसेच साफसफाईची आवश्यकता असते. - दैनंदिन कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात. त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये इरिटेशनही होऊ शकते. - सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स महाग आहेत. आणि त्याची काळजी घेणेदेखील महाग आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips

  पुढील बातम्या