या पदार्थांमुळे तुमच्या घामाला येतो सर्वाधिक दुर्गंध, वेळीच खाणं सोडा!

या पदार्थांमुळे तुमच्या घामाला येतो सर्वाधिक दुर्गंध, वेळीच खाणं सोडा!

अनेकदा दोन व्यक्तींना समप्रमाणात घाम आला तरी काहींच्या घामाला वास येतो तर काहींच्या घामाला काहीच वास येत नाही.

  • Share this:

गंध दोन प्रकारचे असतात. चांगला आणि वाईट. प्रत्येक गोष्टीला एक ठराविक गंध असतो. जसा आपल्या शरीराला असतो. घामामुळे अनेकांच्या शरीराला चांगला गंध येत नाही. अनेकदा दोन व्यक्तींना समप्रमाणात घाम आला तरी काहींच्या घामाला वास येतो तर काहींच्या घामाला काहीच वास येत नाही. अनुवंशिकता, आरोग्य, स्वच्छता इत्यादी अनेक गोष्टींवर आपल्या शरीराला येणारा गंध अवलंबून असतो.

आपल्या शरीराचा गंध बॅक्टेरियावर अवलंबून असतो. आपल्याला येणारा घाम हा प्रोटिन आणि साखरेपासून तयार झालेला असतो. याशिवाय आपण जे खातो त्यावरही आपल्या शरीराचा गंध अवलंबून असतो. अनेक जण शारीरिक स्वच्छता अगदी चोख ठेवतात. तरीही त्यांच्या अंगातून दुर्गंध येतो. याचं मुख्य कारण ते खात असलेले पदार्थ. काही खाद्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ले तर शरीरातून दुर्गंध बाहेर पडतो. नक्की ते कोणते पदार्थ ते जाणून घेऊ-

- तुम्ही जास्त कांदे, लसूण खाल्लं तर शरीरातून वाईट गंध येतो. कारण यात सल्फर आणि एलिसिन असतं. त्याचा वास बराच काळ शरीरात टिकतो. याशिवाय कोबी आणि फ्लाॅवर जास्त खाल्ला तरी शरीरातून दुर्गंध येतो.

- कांदा आणि लसूणाशिवाय काही फळं आणि भाज्यांमध्ये पोटेन्ट कॅरेटेनाॅइड्स असतं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरातून येणाऱ्या गंधावर होतो. त्यामुळे कुठलंही जेवणं जेवताना किंवा आहार घेताना खूप काळजी घ्या.

कारण शरीरातून येणाऱ्या गंधाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. त्यानं तुमच्याबद्दलची प्रतिमा कळत- नकळतपणे तयार होत असते. यावर उपाय म्हणजे, हल्ली बाजारात अनेक प्रकारचे डिओ आणि सेन्ट उपलब्ध असतात. ते तुमच्या शरीराचा दुर्गंध दूर करतात. पण बऱ्याचदा डिओ वापरूनही शरीराचा उग्र वास जात नाही. तेव्हा आपण काय खातो याचा विचार करावा.

लता मंगेशकरांना झाला निमोनिया, जाणून घ्या याचे लक्षण आणि उपाय

पाकिस्तान नाही तर हे देश आहेत संपण्याच्या मार्गावर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

ही आहे जगातील सर्वात महाग इमारत, किंमत 70 हजार कोटी रुपयांहूनही जास्त

...म्हणून हवामान बदललं तु्म्ही आजारी पडता

भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 10:08 AM IST

ताज्या बातम्या