जगभरात एकाहून एक सर्वोत्कृष्ट इमारती आहेत. या इमारतींकडे पाहिल्यावर ती निर्माण करणाऱ्यांच्या कौशल्याची दाद दिल्यावाचून राहवत नाही. या इमारतींच्या किंमती या अब्जावधींमध्ये आहे. अशाच काही सर्वोत्कृष्ट आणि सर्वात महाग इमारतींबद्दल जाणून घेऊ.
जगातील सर्वात महागडी इमारत आहे ती म्हणजे द कॉस्मोपॉलिटन. अमेरिकेतील या इमारतीची सध्याची किंमत जवळपास 312.04 अब्ज रुपये आहे.
चौथी सर्वात महागडी इमारत आहे ती म्हणजे अॅपलचे हेडक्वार्टर. अॅपल पार्क नावाच्या या इमारतीची किंमत जवळपास 354.60 अब्ज रुपये आहे.
तिसरी सर्वात महागडी इारत आहे ती म्हणजे सिंगापूरमधील मरीन बे सँड्स. या इमारतीची किंमत जवळपास 425.52 अब्ज रुपये आहे.
जगातील सर्वात महागडी दुसऱ्या नंबरची इमारत मक्कामधील अब्राज अल बेयत टॉवर्स आहेत. या टॉवर्सची किंमत जवळपास 1134.72 अब्ज रुपये आहे.
सौदी अरबमधील मक्कामधीलच मस्जिद अल-हरम ही जगातील सर्वात महागडी इमारत आहे. सर्वात महागड्या इमारतींच्या यादीत ही इमारत अग्रणी आहे. स्टॅटिस्टानुसार या इमारतीची किंमत जवळपास 7092 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.