गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, लता दिदिंना रात्री जवळपास 2 वाजता रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. निमोनिया हा तसा वरकरणी साधा ताप वाटतो पण वेळीच यावर योग्य उपचार केले नाहीत तर याने प्राणही जाऊ शकतात. आज आपण याची लक्षणं आणि यापासून कसा बचाव करायचा ते जाणून घेऊ..
हेल्थ लाइन या वेबसाइटनुसार निमोनियाचे काही लक्षण पुढील प्रमाणे आहेत-
- ताप येणं
- खोकताना एक विशिष्ट आवाज येणं
- भरपूर थंडी वाजणं किंवा घाम येणं
- दररोजची कामं करताना धाप लागते आणि श्वास घ्यायला त्रास होतो
- श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो
- दरवेळी थकवा जाणवतो आणि सुस्ती आल्यासारखी वाटते
- भूक लागत नाही
- उल्ट्या येतात किंवा उल्टी येईल असं सतत वाटत राहतं
- डोकं दुखणं
निमोनिया म्हणजे नक्की काय-
संसर्गामुळे फुफ्फुसांना येणाऱ्या सुजेला निमोनिया म्हणतात. या आजारात फुफ्फुसांच्या आत हवेऐवजी पू व्हायला सुरुवात होते. यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळायला त्रास होतो.
निमोनियापासून वाचण्याचे उपाय-
अनेक प्रकारे निमोनियापासून वाचता येऊ शकतं. यात लसीकरणं होणं फार गरजेचं आहे. पीव्हीसी13 (PVC13) आणि न्यूमोवॅक्स (Pneumovax 23, PPSV23) हे निमोनियाच्या काही लस आहेत. पण या लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. Hib vaccine ही निमोनियासाठी एक चांगलं लसीकरण आहे. निमोनियापासून वाचण्यासाठई धुम्रपान सोडणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही नियमितपणे हात स्वच्छ धुणं, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरायला विसरू नका. एकदा वापरलेला टिश्यू शक्यतो दुसऱ्यांदा वापरू नका आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घ्या.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
पाकिस्तान नाही तर हे देश आहेत संपण्याच्या मार्गावर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
ही आहे जगातील सर्वात महाग इमारत, किंमत 70 हजार कोटी रुपयांहूनही जास्त
...म्हणून हवामान बदललं तु्म्ही आजारी पडता
भारतातील ही शहरं बुडताना पाहिलं सध्याची पिढी, यात मुंबईच्याही नावाचा उल्लेख